शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्याध्यापक गळ्यात हात घालून फोटो काढतात..."; शिक्षिकेने सांगितला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:12 IST

मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील उच्च प्राथमिक शाळेत नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकाला BSA ने निलंबित केलं आहे. मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षिकेने याला विरोध केला असता मुख्याध्यापकांनी तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. हे सर्व शिक्षिका बराच वेळ सहन करत राहिली होती. 

शिक्षिकेने मात्र हा सर्व प्रकार रोज घडू लागल्यावर एबीएसएकडे तक्रार केली. हे प्रकरण राया ब्लॉकचे आहे. शिक्षिकेने सांगितले की, प्रिन्सिपल करतार सिंह तिच्यासोबत हे सर्व खूप दिवसांपासून करत होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, "मुख्याध्यापक माझ्या गळ्यात हात घालायचे. मग विद्यार्थ्यांना फोटो काढायला सांगायचे. घरी जातानाही मला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसायला सांगत असे."

"मुख्याध्यापकांसोबत आणखी एक व्यक्तीही होती. त्याच्यासमोरही ते माझ्यासोबत अश्लील कृत्य करायचे." शिक्षिकेने पुढे सांगितले की, तिने अनेकदा विरोध केला. त्यामुळे मुख्याध्यापक शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत ​​असत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

तक्रार आल्यानंतर राया एबीएसए यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात प्रथमदर्शनी आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी बीएसएला पत्र लिहून करतार सिंह यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीएसएने प्राचार्य करतार सिंह यांना निलंबित केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी