शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काही खरे नाही, चक्क मरण पावलेल्या व्यक्तीला केले आरोपी; एकाच गुन्ह्यासाठी दोनदा FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:04 IST

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली.

मुंबई :  मालवणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केला आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचेही नाव नमूद केले. हा गुन्हा बोरिवली तहसीलदार कार्यालयाच्या विभागीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार करण्यात आल्याने स्थानिक तक्रारदारांचे आणि अधिकाऱ्यांचे यात साटेलोटे असल्याचा आरोप वकिलाकडून करण्यात आला आहे.

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली. याप्रकरणी बोरिवली तहसीलदार कार्यालयातील विभागीय अधिकारी संतोष लोकरे यांनी २७ डिसेंबर,२०२१ रोजी घटनास्थळी भेट दिल्यावर  केलेल्या तक्रार अर्जावरून मालवणी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी त्रिलोकनाथ तिवारी ऊर्फ मौजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात बाबुमियाँ सरदार आणि शशी दुबे ही नावे आरोपी म्हणून जोडण्यात आली.  

स्थानिकांकडे चौकशी केली असता झोपड्या या तिघांच्या असल्याचे समजल्याचे लोकरे यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, तिवारी याच्यावर याच गुन्ह्यात २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याच्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. तर दुबे हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी असताना ३० एप्रिल २०२१ रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या एफआयआरमध्येही टाकत मालवणी पोलिसांनी कलम ४४१ (जो कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने दुसऱ्याच्या ताब्यातील मालमत्तेमध्ये किंवा त्याच्या ताब्यात प्रवेश करतो), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून पिळवणूक करण्याच्या उद्देशाने काही खोडकर घटक हे प्रकार करत असून अधिकाऱ्यांचेही त्यांना पाठबळ असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे.

 मग ‘त्याचा’ मृत्यू  झाल्याचे नाही समजले? ‘माझ्या अशिलावर मालवणी पोलिसांनी दुसरा एफआयआर दाखल करण्यापूर्वी स्वत:च्या नोंदी तपासल्या नसल्याचे दिसून येते. त्यांनी २०१९ मध्ये त्याच गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करत कलम ४४७ अंतर्गत अटक केली ज्यात त्याची जामिनावर सुटका झाली. या खटल्यात आरोपपत्रही दाखल केले. मात्र, २०२१ मध्ये तहसीलदार कार्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट न देताच निव्वळ स्थानिक तक्रारदाराच्या सांण्यावरून तक्रार केल्याचा संशय मला आहे. कारण त्यांनी जर भेट दिली असती तर दुबे यांच्या मृत्यूबाबत त्यांना माहिती मिळाली असती. त्यानुसार स्थानिक तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचेच यातून समोर येत आहे’. - विजय शुक्ला, आरोपी तिवारीचे वकील 

बोरीवली तहसीलदारांचे ‘मौन’ 

ॲड. शुक्ला यांच्या आरोपाबाबत बाजू जाणून घेण्यासाठी ‘’लोकमत’’ प्रतिनिधीने तहसीलदार विनोद धोत्रे यांना फोन आणि मेसेजवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. तसेच मेसेजला देखील उत्तर दिले नाही.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी