विरार - वालीव पोलिसांनी महामार्गावर बोगस पोलीस बनून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम राठोड(35), विनोद दुबे(41), राधेश्वर चव्हाण(31) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.पोलिसांनी घटनास्थळावरील मिळालेल्या वस्तूवरून आरोपींचा शोध लावत आरोपी श्याम राठोड (35), विनोद दुबे (41), राधेश्वर चव्हाण (31) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून मोटार सायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 55000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत
By पूनम अपराज | Updated: November 17, 2020 18:45 IST
Fake Police Arrested : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत
ठळक मुद्देश्याम राठोड(35), विनोद दुबे(41), राधेश्वर चव्हाण(31) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून मोटार सायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 55000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.