शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सेक्स करण्यासाठी कपडे काढणार इतक्यात लेफ्ट. कर्नलने डोक्यात हातोडा मारला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:49 IST

९ सप्टेंबरला मी श्रेयाला बियर पिण्याच्या बहाण्याने घेऊन आलो, मी कार जंगलाच्या दिशेने नेली, मला श्रेयाला मारून टाकायचे होते असं आरोपीने सांगितले.

डेहराडून– बारमध्ये काम करणाऱ्या एका युवतीसोबत सैन्यातील लेफ्टनंट कर्नलचे अफेअर सुरू होते. परंतु तिने पत्नीचा दर्जा मागितला. परंतु कर्नल आधीच विवाहित होता. पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पत्नीलाही माहिती झाले. त्यानंतर ‘पती-पत्नी और वो’ असा वाद सुरू झाला. यातूनच कर्नलने एकेदिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले आणि निर्जनस्थळी घेऊन जात तिची निर्दयी हत्या केली. परंतु खूनी कर्नलचे हे कृत्य जास्तकाळ लपून राहिले नाही. त्याला पोलिसांनी पकडले. ३ वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर झालेली हत्या पोलिसांनी तपासात उघड केली.

पोलिसांनी अटक केलेला आरोपी रामेंद्रु उपाध्याय म्हणाला की, मी आर्मीच्या डेहराडून इथं लेफ्टनंट कर्नल पदावर तैनात आहे. काही दिवसांपूर्वी माझी पोस्टिंग सिलिगुडी पश्चिम बंगालपासून डेहराडून इथं झाली होती. जानेवारी २०२० मध्ये माझी मुलाखत नेपाळी युवती श्रेया शर्मासोबत एका डान्सबारमध्ये झाली. हा डान्सबार पश्चिम बंगालमध्ये होता. मला श्रेया खूप आवडायला लागली होती. सर्वात प्रथम श्रेयासोबत माझी मैत्री झाली. त्यानंतर आमच्यात संबंध बनले.

सिलिगुडी येथे पती-पत्नीसारखे आम्ही दोघे राहत होतो. श्रेयाचा सर्व खर्च मी करायचो. परंतु जेव्हा माझी पोस्टिंग डेहराडून इथं झाली तेव्हा श्रेयालाही मी माझ्यासोबत घेऊन आलो. हे माझ्या पत्नीला कळाले. काही दिवस श्रेयाला मी एका हॉटेलवर थांबवून त्यानंतर पुन्हा सिलिगुडी इथं पाठवले. परंतु पुन्हा मी तिला डेहराडूनला बोलावले. त्यानंतर याचठिकाणी एक फ्लॅट घेऊन तिला तिथे ठेवले. सर्वकाही सुरळीत सुरू होते. परंतु तिने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. ती मला शिव्या देऊ लागली. मला दारू आणि जेवणासाठी पैसे मागत होती. मी दररोज तिच्या फ्लॅटमध्ये येऊन जायचो. माझ्या पत्नीलाही माहिती पडले होते. श्रेया वारंवार माझ्याशी भांडू लागली. माझ्याशी लग्न कर असा हट्ट तिने केला. एकदा माझी पत्नी श्रेयाच्या फ्लॅटवर आली. तिथे श्रेयासोबत तिची भांडणे झाली. मी खूप त्रस्त झालो होतो. त्यासाठी श्रेयाला कायमचं संपवायचे असा प्लॅन मी आखला असं आरोपी कर्नलने पोलिसांसमोर कबूल केले.

९ सप्टेंबरला मी श्रेयाला बियर पिण्याच्या बहाण्याने घेऊन आलो, मी कार जंगलाच्या दिशेने नेली, मला श्रेयाला मारून टाकायचे होते. त्यासाठी कारमध्ये हतोडी आणि टॉयलेट क्लीनरही आणला होता. दारुच्या नशेत श्रेयाला माझ्यासोबत शारिरीक संबंध बनवायचे होते. ती कपडे काढू लागली. त्यावेळी मी हतोडीने तिच्या डोक्यावर वार केला. ती मरेपर्यंत मी मारत राहिलो. त्यानंतर तिची हत्या केल्यानंतर जंगलात तिचा मृतदेह फेकून निघून गेलो असं आरोपीने सांगितले. १० सप्टेंबरला एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या अथक तपासात लेफ्टनंट कर्नलचा शोध लागला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या हत्येचा खुलासा झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी