शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

फाशीचा दिवस येतोय जवळ; निर्भयाच्या दोषींना तुरुंग प्रशासनाने विचारली शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 15:39 IST

चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडले आहे.

ठळक मुद्देतुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, संपत्ती आदी गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांसंदर्भात काही निश्चित प्रक्रिया तुरुंग प्रशासनाला पूर्ण करणे गरजेच्या असतात.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषींकडून फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तिहार तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फाशीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी तुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, संपत्ती आदी गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांसंदर्भात काही निश्चित प्रक्रिया तुरुंग प्रशासनाला पूर्ण करणे गरजेच्या असतात. अशा कैद्यांची शेवटी इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण करण्यात येते.निर्भयाच्या दोषी गुन्हेगारांना तुरुंग प्रशासनाकडून १ फेब्रुवारी रोजी फासावर जाण्याआधी ते कुणाची भेट घेऊ इच्छितात? त्यांच्या नावावरची मालमत्ता किंवा बँक खात्यातील रक्कम ते कोणाच्या नावावर करू इच्छितात? कुणाला वारसदार जाहीर करणार आहेत का? मृत्यूपत्र करणार आहेत का? कोणतं धार्मिक किंवा आवडतं पुस्तक वाचू इच्छित आहात का?, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

विनय शर्माने केला होता आत्महत्येचा प्रयत्ननिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात शौचालयात गळ्याला फास आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. विनयला २४ तासांसाठी वैद्यकीय देखरेख कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगात सीसीटीव्ही फुटेज आणि कडक बंदोबस्त असतानाही विनयने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार बुधवारी सकाळी झाल्याचे विनय शर्माचे वकील ए.पी.सिंह यांचा दावा आहे. मात्र तुरुंगातील सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले आहे.

Nirbhaya Case : दोषी पवन अल्पवयीन असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळलाफाशीच्या भीतीने खाणं-पिणं सोडलंचारही दोषींनी फाशीच्या भयाने खाणं-पिणं सोडलं आहे. चौघापैंकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यातुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे.चारही आरोपींना त्यांच्या इच्छेविषयी विचारल्या काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडले आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयjailतुरुंग