शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

नगररचना सहसंचालकांच्या मुलासह नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:39 IST

बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर प्रकरण

ठळक मुद्देतीन जणांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाणयात गुन्हा दाखल

बारामती : बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या मुलासह त्यांच्या नातेवाईकाचा अटकपुर्व जामीन नामंजुर करण्यात आला आहे. तर त्यांच्या मुलीला मात्र बारामती येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी त्यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर, मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर  (रा. स्वप्नशील्प अपार्टमेंट, कोथरुड, पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंदकुले (पत्ता माहित नाही)  या तीन जणांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संग्राम तानाजी सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) यांनी याबाबत २६ जुन रोजी फिर्याद दिली होती.फिर्यादीनुसार दि. ९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामतीत विद्युत मंडळाच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रवीण यांच्या नावे  बनावट नोटरी भाडे करार व भाडेपट्टा तयार करत ती खरी आहेत असे भासवून नाझीरकर व पोंदकुले यांनी ती कागदपत्रे बारामतीतील विद्युत मंडळ कार्यालयात दाखल केली. विद्युत पुरवठा कायम राहावा म्हणून त्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. प्रवीण यांच्या नावे बनावट भाडेपट्टा तयार करत विद्युत मंडळा विरुद्ध मनाई मिळावी यासाठी तो बारामती न्यायालयात वापरण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात भादंवि कलम ४६७, ४७१,४७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयात मंगळवारी(दि २१) आरोपींच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.यावेळी सरकारी वकील अ‍ॅड स्नेहल बडवे नाईक यांनी युक्तीवाद केला. आरोपी भास्कर नाझीरकर याने नोटरी भाडे करारावर फिर्यादी यांचे भाऊ प्रविण सोरटे याची खोटी सहि केली आहे.त्या सहिचे नमुने घेणे आवश्यक आहे.त्यामुळे आरोपीला अटक करुन तपास करणे आवश्यक आहे. आरोपीकडुन मुळ नोटरी करार हस्तगत करावयाचा असुन गुन्ह्यातील आरोपीने विद्युत मंडळाला सादर केलेला भाडे करार व भाडे पट्याचा तपास करावयाचा आहे. तसेच आरोपी हेमंत याने खरेदी केलेल्या स्टँपचे  ठीकाण,भाडेकरार केलेल्या ठीकाणाबाबत तपास करावयाचा आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी बनावट दस्तऐवज बनविताना शिक्के बनविल्याची शक्यता आहे.हे शिक्के बनविलेल्या ठीकाणाबाबतचा तपास करावयाचा आहे. सबंधित गुन्हा बनावट दस्तऐवज तयार करुन फसवणुकीचा असल्याने आरोपी माहिर आहेत.त्यामुळे आरोपींनी आणखी कोठे फसवणुकीचा दखलपात्र गुन्हा केला आहे का?याबाबत तपास करणे आवश्यक आहे,असा युक्तीवाद अ‍ॅड बडवे— नाईक  यांनी न्यायालयात केला आहे. न्यायालयाने तो मान्य करत दोघांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. तर नाझीरकर यांच्या मुलीचा मात्र मंजूर करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांना का शोधू शकत नाही हे मोठे कोडे आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय