शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन पूजा करताय, प्रसाद मागवताय; थोडे जपून..., सिद्धिविनायकाच्या भक्तांना फसविणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:52 IST

सिद्धीविनायक मंदिर न्यास येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत असलेले जनार्दन आनंद शिरवाडकर यांच्या न्यासाच्या इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई : सिद्धीविनायकाच्या ऑनलाइन पूजेसह घरपोच प्रसाद देण्याच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या चारपैकी एका आरोपीला कोलकात्याहून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुपोर्नो प्रदीप सरकार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरू असून, इतर तीन आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे.

सिद्धीविनायक मंदिर न्यास येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत असलेले जनार्दन आनंद शिरवाडकर यांच्या न्यासाच्या इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, ‘उत्सव पूजा ॲप’ या गुगल प्ले स्टोअर ॲपवरून भाविकांकडून ऑनलाइन सिद्धीविनायक पूजा, घरपोच प्रसादाच्या नावाखाली ७०१ रुपयांपासून २१ हजार १ रुपये घेऊन फसवणूक केली जात होती. त्यामुळे मंदिराने तक्रार दिल्याने बोगस अशा उत्सव ॲपच्या अज्ञात व्यक्तींवर दादर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कसा केला तपास?­ ॲपवर पैसे भरलेल्या महिलेच्या गुगल पे या ट्रान्झॅक्शनची माहिती घेतली. ­ महिलेला पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मोबाइल नंबरचे विश्लेषण केले. ­ बोगस उत्सव ॲपच्या जी-मेलचे गुगलवरून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले. ­ कोलकाता (पश्चिम बंगाल)मधील चार आरोपी असल्याचे समोर आले.

भाविकांनी काय करावे ?­ ऑनलाइन पूजा तसेच इतर सेवांसाठी देवस्थानच्या अधिकृत वेबसाइट, ॲपचा वापर करावा. अधिकृत वेबसाइट ही सर्च इंजिनद्वारे सर्च करताना त्या वेबसाइटला एचटीटीपीएस : / आहे का ते पाहावे. म्हणजेच ती वेबसाइट सुरक्षित आहे का? ते समजते. वेबसाइट ओपन केल्यानंतर ब्लॉकच्या यूआरएल या सुरुवातीला लॉक असेल तर ती वेबसाइट जास्त सुरक्षित असेल, असे समजावे. ॲप डाऊनलोड करून त्याचे रेटिंग पाहावे. ॲप वापरकर्त्यांकडून कोणकोणत्या परवानगी मागत आहे, हे तपासावे.

पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यात बोलपूर येथे राहणारा सुपोर्नो प्रदीप सरकार ॲप डाऊनलोड केल्यानंतर ऑनलाइन पूजा व घरपोच प्रसादासाठी रजिस्ट्रेशन करून पैसे भरण्यास सांगत असे. म्हणून तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी