चेन्नई - अब्जोची टेक कंपनी सुरू करणाऱ्या एका उद्योजकानं त्याच्या आयुष्यातील दु:ख सोशल मीडियात शेअर केले आहे. पत्नी आणि पोलिसांकडून त्याचा छळ सुरू असल्याचा आरोप त्याने केला. चेन्नई पोलिसांपासून ते पळ काढत आहेत. पत्नीने त्यांचा विश्वासघात केल्याचं बोलत आहेत. याबाबतचे काही पुरावेही त्यांनी उघड केले ज्यात त्यांची पत्नी परपुरूषाला कंडोम आणण्यासाठी सांगत असल्याचं चॅटही समोर आले आहे.
सिंगापूर क्रिप्टो सोशल नेटवर्क OxPPL डॉट कॉमचे संस्थापक प्रसन्ना शंकर यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रसन्ना यांनी रिपलिंग नावाची कंपनी बनवली आहे. ते सांगतात की, माझा घटस्फोट झाला आहे. परंतु मी आता चेन्नई पोलिसांपासून पळत आहे. सध्या मी तामिळनाडूच्या बाहेर लपलोय. चेन्नईत जन्मलेले प्रसन्ना यांनी NIT त्रिची येथून शिक्षण घेऊन कंपनी सुरू करण्यासाठी अमेरिकेत गेले. अलीकडेच प्रसन्ना यांचं लग्न तुटलं आहे. ज्यामागे पत्नीचे अफेअर कारणीभूत असल्याचं त्यांनी आरोप केला.
NIT त्रिची इथं शिकताना प्रसन्ना शंकर यांची भेट दिव्याशी झाली. या दोघांनी लग्न केले. लग्नाला १० वर्ष होत असून दोघांना ९ वर्षाचा मुलगा आहे. दिव्याचं अनूप नावाच्या युवकासोबत गेल्या ६ महिन्यापासून अफेअर सुरू असल्याचं प्रसन्नाने सांगितले. त्यांनी काही पोस्टमध्ये स्क्रिनशॉट्स शेअर केलेत. त्यात पत्नीकडून अनुपला पाठवलेले मेसेज आहेत. पहिल्या स्क्रिनशॉट्समध्ये दिव्याचे मेसेज पाहता येतात. त्यात तू एक्स एल साइजमध्ये कंडोम घेऊन ये, ते गार्जियन, वॉटसन्स अथवा ७-११ वर आहे. या मेसेजला रिप्लाय देऊ नकोस, मी आता डिलिट करत आहे. हे सर्व ऑर्चर्ड रोडवर आहे. हे सर्व मेसेज अनूपच्या पत्नीने प्रसन्ना यांना पाठवल्याचं त्याने म्हटलं आहे. दुसऱ्या स्क्रिनशॉट्समध्ये २ एडल्ट्ससाठी हॉटेल रूम बुकींग आहे. ज्यात दिव्याच्या ईमेल आयडीवरून बुक केले आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर आमच्यात घटस्फोटानंतर मला तिला किती डॉलर द्यावे लागतील यावर चर्चा झाली तेव्हा ती नाखुश होती. तिने माझ्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मी तिला मारल्याचा आरोप केला. बनावट आरोप करत मला अडकवण्याचा प्रयत्न तिने केला. मी तिचे न्यूड व्हिडिओ व्हायरल केलेत असा आरोप केला. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आणि या प्रकरणात मला निर्दोष ठरवले. मी भारतातही घटस्फोटासाठी अर्ज केला तिने अमेरिकेत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जेणेकरून यातून तिला अधिकचे पैसे मिळावेत असा आरोप पती प्रसन्नाने केला.