शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Sameer Wankhede: प्रभाकर साईलने थेट समीर वानखेडेंचेच नाव घेतले; NCB पुन्हा चौकशीला बोलविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 09:46 IST

Aryan Khan Drug Case: एनसीबीच्या स्पेशल टीमला आम्ही नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यानंतरच प्रभाकर चौकशीला सामोरा जाईल. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल केला जावा, असे  तुषार खंडारे म्हणाले. 

मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईलची एनसीबीची समिती चौकशी करत आहे. या समितीमध्ये सात अधिकारी आहेत. डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह बांद्र्याच्या सीआरपीएफ गेस्ट हाऊसवर सोमवारी पोहोचले आहेत. प्रभाकर सैलची सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून कसून चौकशी करण्यात आली. तो आपल्या वकिलांसोबत तिथे गेला होता. 

जवळपास सहा-सात तास त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर आज पुन्हा प्रभाकर साईलला (Prabhakar Sail) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीचे अधिकारी प्रभाकर साईलची चौकशी करणार आहेत. आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती असा आरोप साईल याने केला होता. कालच्या चौकशीतही त्याने समीर वानखेडे खंडणी उकळण्याच्या कटात सहभागी होते, अशी माहिती एनसीबीला दिली आहे. साईलचे वकील तुषार खंडारे यांच्यानुसार एनसीबी सध्या साईलचा जबाब नोंदवत आहे. क्रूझवर रेड टाकण्याचा खेळ हा केवळ पैसे उकळण्यासाठी केला गेला. यामध्ये एकटे समीर वानखेडे नाहीत, एनसीबीचे अन्य अधिकारी देखील असण्याची शक्यता आहे. 

एनसीबीच्या स्पेशल टीमला आम्ही नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यांनतरच प्रभाकर चौकशीला सामोरा जाईल. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल केला जावा, असे  तुषार खंडारे म्हणाले. प्रभाकरमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच यापैकी 8 कोटी रुपये हे वानखेडेंना देण्यात येणार होते, असा दावाही त्याने केला आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAryan Khanआर्यन खान