लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान मुलांचे अश्लील चित्रीकरण असलेले व्हिडीओ फेसबुक, यू ट्यूबसारख्या सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या संशयित आरोपींविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.द नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅन्ड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी) यांच्या मार्फत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नवी दिल्लीकडून विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नोडल अधिकारी महाराष्ट्र सायबर यांच्या मार्फत चाईल्ड पोर्नग्राफी बाबतची माहिती स्थानिक सायबर सेलला देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तपास करून गुरुवारी शहरातील गणेशपेठ, जरीपटका, सक्करदरा आणि नंदनवन ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध लहान मुलांचे अश्लील चित्रीकरण असलेले व्हिडीओ फेसबुक व यू ट्यूब सारख्या सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस ठाण्याच्या मार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारे कुणी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे गुन्हे केले असेल किंवा अशा गुन्ह्यांची माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी केले आहे.
नागपुरात लहान मुलांचे अश्लिल चित्रीकरण सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:48 IST
लहान मुलांचे अश्लील चित्रीकरण असलेले व्हिडीओ फेसबुक, यू ट्यूबसारख्या सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या संशयित आरोपींविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात लहान मुलांचे अश्लिल चित्रीकरण सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर गुन्हे
ठळक मुद्देसंशयित आरोपींचा तपास सुरू