शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचे ‘प्रदूषण’: प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:20 IST

Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले.

नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय५७,रा.औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अहमदनगर येथक्षल गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्राकरिता अर्ज व मुळ कागदपत्रे दाखल केली होती. यानंतर औरंगाबाद येथील प्रादेशिक अधिकारी तथा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त पदभार सांभाळणारे वर्ग एकचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी व नाशिक येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी कुशल औरचमल यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून हकिगत सांगत तक्रार अर्ज दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची पडताळणी करत सापळा कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलीस उपअधिक्षक सतीश भामरे, पोलीस निरिक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड आदींच्या पथकाने सापळा रचला.

लाचखोर जोशी व औरचमल यांनी तक्रारदाराकडून प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच पंचांसमक्ष सातपुरजवळील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात स्वीकारली. यावेळी सापळा कारवाईच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सातपुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. यावर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अद्यापपर्यंत झालेली ही पहिलीच सापळा कारवाई आहे. दोन वर्षांपुर्वी अशाचप्रकारे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.

औरंगाबाद येथे मुळ नेमणूक; नाशिकचा अतिरिक्त पदभारप्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील सोपविण्यात आला होता. यादरम्यान, संमतीपत्राकरिता दोघा अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बेकायदेशीरपणे रक्कम अर्जदाराकडून स्वीकारली. यामुळे पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

टॅग्स :NashikनाशिकBribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचार