शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

लग्नासाठी नोकरी न सोडणाऱ्या पोलीस तरुणीलाच खुनाची धमकी, विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 02:15 IST

Crime News : पोलीस खात्याची नोकरी न सोडल्यामुळे आधी लग्नाला नकार दिला. त्यानंतर पुन्हा नोकरी सोडण्याचीच अट घातल्यामुळे ठरलेले लग्न मोडले. त्यानंतरही दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह पतीचाही खून करील, अशी धमकी दिली.

ठाणे - पोलीस खात्याची नोकरी न सोडल्यामुळे आधी लग्नाला नकार दिला. त्यानंतर पुन्हा नोकरी सोडण्याचीच अट घातल्यामुळे ठरलेले लग्न मोडले. त्यानंतरही दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह पतीचाही खून करील, अशी धमकी देत मोबाईल स्टेटसवर अश्लिल मजकूर टाकणाऱ्या अमर गंगाधर जोंधळे (२९, रा. आजरसोंडा, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  ठाणे शहर पोलीस दलातील एका २५ वर्षीय तरुणीचे तिच्याच नात्यातील अमरशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने १७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर त्याने नोकरी सोडली तरच लग्न करेल, असा आग्रह केला. त्यावरुन दोन्ही कुटुंबीयांच्या बैठकीत त्याची समजूत घालण्यात आली. तरीही त्याने हट्ट न सोडल्यामुळे दोघांनीही संपर्क तोडला. काही दिवसांनी पुन्हा त्याने नोकरीचा अडसर नसल्याचा बहाणा करीत लग्नाला तयारी दर्शविली. २७ जून २०२० ही लग्नाची तारीख ठरली. मात्र २ जून रोजी नोकरी न सोडल्यास लग्न न करण्याचा त्याने पुनरुच्चार केला. तिनेही लग्नाला स्पष्ट नकार दिला. यातूनच संतप्त झाल्यामुळे त्याने मोबाइल स्टेटसवर तिचे फोटो ठेवले. दुसऱ्याशी लग्न केल्यास खून करण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत तिने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तरीही अमरकडून त्रास सुरुच होता. 

मोबाइल नंबरही बदललाआरोपी अमरपासून सुटकारा मिळवण्यासाठी पीडित तरुणीने मोबाइल क्रमांक बदलून अमरचा क्रमांकही ब्लॉक केला. तरीही त्याने २४ ऑक्टोबर रोजी मोबाइल स्टेटसवर तिच्याबद्दल अश्लील मजकूर टाकून तिची बदनामी केली. अखेरिस या पोलीस तरुणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी