शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेल्या गाड्यांना ‘पोलीस’ स्टिकर, चोरट्यांच्या क्लृप्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 06:17 IST

मोटारसायकल चोरल्यानंतर तिला ‘पोलीस’ असल्याचा स्टिकर लावायचे आणि नंतर तीच गाडी आपल्या कोणत्याही कामासाठी वापरायची, अशी धक्कादायक माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे  - मोटारसायकल चोरल्यानंतर तिला ‘पोलीस’ असल्याचा स्टिकर लावायचे आणि नंतर तीच गाडी आपल्या कोणत्याही कामासाठी वापरायची, अशी धक्कादायक माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.एखाद्या अपघातामध्ये वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्यानंतर गाडीच्या नुकसानीचा क्लेम संबंधित वाहनधारकाने केल्यानंतर तिची संपूर्ण नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्यानंतर, लिलावामध्येही गाडी एखाद्या एजंटकडून खरेदी केली जाते. याच गाडीची चेसिस काढून ती चोरीच्या गाडीला लावली जाते. इंजीनचा क्रमांक ग्राइंडरनेखोडून टाकला जातो. अशा प्रकारे चोरीची गाडी रस्त्यावर आणली जाते. हसन जाफरी, शमीम अन्सारी आणि सन्नान खान या मुंब्य्रातील टोळीकडून अनेक वाहनांची चोरी उघड झाली आहे. चारचाकी वाहने चोरून नेण्यात ही टोळी माहीर असल्याचे उघड झाले आहे. सुरेंद्र सोंडकर (भिवंडी), सागर पुवरा (भिवंडी) आणि साकीब अन्सारी (पडघा) या अन्य एका दुचाकी चोरणाऱ्या टोळीलाही अशाच प्रकारे सापळा लावून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. साकीब हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानेही आतापर्यंत अनेक गाड्या चोरल्याचे उघड झाले आहे. साकीबसारख्या अनेक छोट्या टोळ्यांना जेरबंद करण्यात आले असून आतापर्यंत १५६ आरोपींना अटक केली आहे.चोरीच्या वाहनांना ‘पोलीस’चे स्टिकर लावल्यानंतर तेच वाहन स्वत:च्या कामासाठी हे चोरटे वापरत होते. अशाच एका टोळीच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. आणखीही वाहनचोरांचा शोध घेण्यात येत आहे.- प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग,ठाणे शहर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी