शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 05:50 IST

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत. 

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्यावर राजभवनातील कर्मचारी महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. पोलिस पीडित महिलेशी बातचीत करणार असून, त्यांनी राजभवनाकडे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती केली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत. 

एसआयटीने राजभवनातील चार कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आहे. शनिवारी हरे स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये या चौघांचे जबाब नोंदवण्यात आले. राज्यघटनेच्या कलम ३६१ नुसार विद्यमान राज्यपालांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. राजभवनकडून निवेदन जारी करून पोलिसांना राजभवनात प्रवेशासाठी मानाई केली आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी लोक चुकीच्या पद्धतीने याचा तपास करू शकतात,  यात म्हटले आहे. बोस हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला होता. (वृत्तसंस्था) 

महिलेचे नेमके म्हणणे काय आहे? nराजभवनात काम करणाऱ्या महिलेचा आरोप आहे की, २४ मार्च रोजी कायमस्वरूपी नोकरीचा अर्ज देण्यासाठी भेटीसाठी गेले असताना राज्यपालांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. nअसाच प्रकार गुरुवारी पुन्हा घडल्यानंतर राजभवनाबाहेरील पोलिसांकडे तक्रार नोंदविली. 

पीडित महिला राजभवनात काम करते. या प्रकारच्या घटना रोज घडत आहेत; परंतु मी आजवर काही बोलले नाही; परंतु हे प्रकरण वेगळे आहे. राज्यपालांनी दोन वेळा महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. मी तिचे अश्रू पाहिले आहेत. ती महिला घाबरली आहे. राजभवनात काम करणार नाही, असे ती आता म्हणत आहे.     - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMolestationविनयभंग