शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कासारवडवली येथील बारवर धाड: ३८ बारबालांसह ४५ जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 19:26 IST

नियमापेक्षा जास्त वेळ बार सुरु ठेवून बारमध्ये गि-हाईकांना आकृष्ट करण्यासाठी तोकडया कपडयांमध्ये अश्लील नृत्य करणाऱ्या ३८ बारबालांसह बार व्यवस्थापक आणि मालक अशा ४५ जणांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

ठळक मुद्दे बार मालक आणि व्यवस्थापकासह पाच गि-हाईकांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रात्री उशिरापर्यंत चालणा-या घोडबंदर रोड येथील एका बारवर कासारवडवली पोलिसांनी रविवारी पहाटे २ वा. च्या सुमारास धाड टाकून ३८ बारबालांसह ४५ जणांना अटक केली. या सर्वांची तीन लाख ३७ हजार पाच रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर ठाणे न्यायालयाने सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.घोडबंदर रोडवरील ‘खुशी’ या बारमध्ये नियमापेक्षा अधिक बारबाला लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करुन रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खैरनार यांच्यासह पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, अविनाश काळदाते, सहायक पोलीस निरीक्षक सतिश चाबुकस्वार आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर धाड टाकून बारचा मालक विनोद शेट्टी (४२), व्यवस्थापक सुधाकर शेट्टी तसेच पाच गि-हाईक आणि ३८ बारबाला आदी ४५ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बिभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बार बालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरु ठेवून नियमापेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बार मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बार बालांसह बार मालक आणि व्यवस्थापक आदी ४५ जणांची प्रत्येकी सात हजार ५०० रुपयांप्रमाणे तीन लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर ठाणे न्यायालयाने सुटका केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे