शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाची पार्टी बंद केल्याने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; शिपायाच्या हाताचा घेतला चावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:53 IST

मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

उल्हासनगर - नववर्षाची पार्टी बंद केल्याच्या रागातून दोघांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करुन एका पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेतला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.कॅम्प नं.-३, महापालिका टाउन हॉलमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला पार्टी ठेवली होती. मोठ्या आवाजात गाणी लावून झिंगाट झालेले नृत्य करत होते. पहाटे ४ वाजताच्यादरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांनी पथकासह तेथे जाऊन स्पीकर बंद केला आणि टाउन हॉलच्या व्यवस्थापकाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. त्यावेळी पार्टीतील काही जण पोलीस ठाण्यात आले. याबाबत चौकशी सुरू असताना मनीष सोनावणे याने मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू करुन, आम्हाला सकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे सांगितले.मनीष याला चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मनाई केली. तसेच मादक पदार्थाची तपासणी करण्यासाठी सोनावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने उपनिरीक्षक दाभाडे यांची कॉलर पकडून मारहाण केली. या मारहाणीत दाभाडे यांच्या शर्टाची दोन बटणे तुटली. यावेळी दुसरा आरोपी महेश कोरडले यांनी दाभाडे यांना धरून ठेवले होते.अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई वंजारी यांच्या हाताच्या अंगठ्याला सोनावणे याने चावा घेऊन शिवीगाळ केली. तसेच सूचना फलकावर स्वत:चे डोके आपटून इजा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मनीष, महेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसNew Yearनववर्षArrestअटक