शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे यांना CID ने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 22:25 IST

Police officers Nandkumar Gopale and Asha Kokare were arrested : मोठी कारवाई करत सीआयडीने पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.  

मुंबई :  भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड व स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह अनेक पोलिसांवर दाखल गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. त्यानंतर मोठी कारवाई करत सीआयडीने पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.  

या प्रकरणातील सहआरोपी आणि परमबीर यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी व सरकार पाडण्याचा कट रचल्याचा तसेच परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा केला आहे. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेत सीआयडीकडे याचा तपास देण्यात आला आहे.

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने अग्रवाल याच्या तक्रारीनुसार २१ जुलैला परमबीर यांचे निकटवर्तीय पुनामिया, सुनील जैन, उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, वरिष्ठ निरीक्षक आशा कोकरे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी नेमली होती. उपायुक्त निमित गोयल यांच्या नेतृत्वाखाली व तपास अधिकारी एसीपी एम. एम. मुजावर यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे आणि त्याला राजकीय व अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याने सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्या भ्रष्ट व गैर कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या असल्या तरी आतापर्यंत केवळ चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक सीआयडी व दोन ठाणे आयुक्तालयाकडे आहेत. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाही सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. 

अकबर पठाण यांना न्यायालयाचा दिलासा

प्राथमिक चौकशी न करता आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने उपायुक्त अकबर पठाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगExtortionखंडणीArrestअटकPoliceपोलिस