शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् गर्दीत सापडला खाकीतला देव; मोठी दुर्घटना टळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:54 IST

पोलिसांमुळे टळली मोठी दुर्घटना

ठळक मुद्देख़ाकीतला खरा देव सापडल्याचे या मुलीचे म्हणणे आहे. गर्दीत ५३ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत़. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाऱ्याने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यात, शंभरावे वर्ष असल्याने दुपारपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविक तेथे धडकले. धक्काबुकी वाढली. यात, भुरळ येवून पडलेल्या चार मुलींना काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बसवत यांनी स्वत: उचलून त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली.जवळपास अडीचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. गर्दीतील रोडरोमियो, पाकिटमार, टवाळखोरांमध्ये, फोटोसाठी धडपडणाऱ्यांमुळे धक्काबुकी झाली. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाऱ्याने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला.चेंगराचेंगरी थांबविण्यास पोलिसांना यश आले. यात झालेल्या धक्काबुकीत काही जण किरकोळ जखमी झाले. मोठी दुर्घटनाटळली. याच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलींकडे बसवत यांचे लक्ष गेले. त्यांनी स्वत: मुलींना उचलून त्यांची रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारे चार मुलींना त्यांनी रुग्णालयात सुखरुप पोहचवले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे ४ मुलांना सुखरूप गर्दीतून बाहेर काढण्यात आले तर ६ मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मोठी दुर्घटना टळलीयाच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलीकडे बसवत यांचे लक्ष गेले. जबरदस्त गर्दी असल्याने गर्दीचा लोंढा त्या मुलीवर येण्याआधीच काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी तिला पकड़ले. त्यात गर्दी आणख़ीनच त्यांच्या अंगावर आली. याच दरम्यान मुलीने बसवत यांना घट्ट पकड़ले. मुलीला गळ्याशी कवटाळत, हातातल्या काठीने गर्दी सावरत त्यांनी त्या मुलीला गाड़ीकड़े आणले. अन्य कर्मचाऱ्याचे बसवतकड़े लक्ष जाताच त्यांनी त्यांच्याकड़े धाव घेतली. मुलीला केईएम रुग्णालयात वेळीच दाखल केले. ते पुढ़े गर्दित अशाच प्रकारे चार मुलींना त्यांनी रुग्णालयात सुखरुप पोहचवले. ख़ाकीतला खरा देव सापडल्याचे या मुलीचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत काळाचौकी पोलीस त्या मुलीच्या संपर्क़ात होते. 

५३ मोबाईल ग़ायबगर्दीत ५३ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत़. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

 

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइलGanesh Mahotsavगणेश महोत्सवKEM Hospitalकेईएम रुग्णालय