शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याला एक दिवसाचा तुरुंगवास, दंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:21 IST

अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वांचा भंग: अटकेपूर्वी नोटीस दिली नाही 

- खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून एका व्यक्तीला अटक केल्याबद्दल पोलीस अधिकारी न्यायालयाच्या अवमानाचा दोषी ठरला. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला एक दिवसाची शिक्षा, २००० दंड आणि १५,००० रुपये नुकसानभरपाईचे आदेश दिले.

दिल्लीतील राकेश कुमार यांच्याविरुद्ध ४०६ आयपीसीचा (विश्वासघात) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी कमाल तीन वर्षांची शिक्षा आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली नाही. ११ दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. 

सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार निकालामध्ये अटकेपूर्वी ४१ अ सीआरपीसीप्रमाणे नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली नाही. अर्नेश कुमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस न देणाऱ्या व या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची कारवाई केली जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

अटक केलेल्या व्यक्तीलाच फक्त अपमान सहन करावा लागतो असे नाही. त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर अटकेचा परिणाम होतो. ज्यांनी अटक पाहिली असेल त्यांना कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याला आणि त्याच्या नातेवाइकांना झालेल्या त्रासाची भरपाई होत नाही.अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वे हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे. ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये अटक अपवाद असावी व पोलिसांना अटक करणे आवश्यक आहे की नाही हे निर्धारित करावे, असे सांगितले आहे.

४१ अ सीआरपीसी : ज्या व्यक्तीविरुद्ध ७ वर्षांपर्यंतच्या शिक्षेचा दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला आहे, अशा व्यक्तीला त्याच्यासमोर हजर राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने नोटीस देणे आवश्यक आहे. नोटीसचे पालन होते तोपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही, अशी तरतूद आहे.

अटक आणि तुरुंगवासामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा संपते. त्याचा इतर अनेक निष्पाप नातेवाइकांवरही परिणाम होतो. नंतरच्या सुटकेने प्रतिष्ठेचे नुकसान किंवा मौल्यवान वैयक्तिक स्वातंत्र्याच्या तात्पुरत्या नुकसानीची भरपाई होत नाही. ज्याला पोलिसांनी नेले आहे, ताब्यात घेतले आहे आणि तुरुंगात टाकले आहे त्याच्यावर कायम कलंक लागतो.   -न्यायमूर्ती नजमी वझिरी, दिल्ली उच्च न्यायालय

टॅग्स :Policeपोलिस