शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

मुलाला मारहाण करणाऱ्या पोलिसाला तीन वर्षे कारावास; दादरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 08:02 IST

५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला

मुंबई : स्कूटरवर टेकून उभा राहिल्याने चौदा वर्षीय मुलाला मारहाण करून त्याच्या नाका-तोेंडातून रक्त काढणाऱ्या ३७ वर्षीय निलंबित पोलिसाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. दादर बसस्टॉपजवळ २०१६ मध्ये ही घटना घडली.एक मुलगा आपल्या स्कूटरवर टेकून उभा राहिल्याने आरोपी शैलेश कदम याने त्याच्या घरातील खिडकीतून पाहिले. खिडकीतूनच शैलेशने मुलावर ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो खाली आला आणि  मुलाला मारहाण करू लागला. ‘आरोपीने क्षुल्लक मुद्द्यावरून १४ वर्षीय मुलाला क्रूरपणे मारहाण केली. हे प्रकरण गंभीर आहे. कारण  आरोपी पोलीस आहे. असहाय्य नागरिक, मुले यांचे रक्षण करणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे,’ असे महानगर दंडाधिकारी प्रवीण देशमाने यांनी म्हटले.  तसेच दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. त्यापैकी २५ हजार रुपये  मुलाला मानसिक त्रासापोटी देण्याचे निर्देश दिले. दुखापतग्रस्त अल्पवयीन मुलगा आणि या घटनेचा साक्षीदार मुलाच्या मित्राने आरोपीला ओळखले. मुलाच्या वडिलांनीही न्यायालयात साक्ष दिली. अल्पवयीन मुलाने न्यायालयाला सांगितले की, तो २२ जानेवारी २०१६ रोजी दुपारी हिंदमाता बस स्टॉपवर होता. बस स्टॉपवर बसण्यासाठी जागा नसल्याने तो बाजूलाच असलेल्या स्कूटरला टेकून उभा राहिला. तेव्हा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीतून आरोपीने मुलाला पाहिले तेव्हा तो त्याच्यावर ओरडला. आरोपी इमारतीच्या खाली आला आणि मुलाच्या कानशिलात लगावली आणि ठोसे लगावले. जेव्हा त्याच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने त्याचे तुकडे करण्याची धमकी दिली. मुलगा कसाबसा घरी पोहोचला आणि त्याने घडलेली घटना वडिलांना सांगितली. त्याच्या वडिलांनी याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर एका आठवड्यातच त्याची जामिनावरही सुटका झाली.शिक्षेत दया दाखवण्यास नकारसुनावणीदरम्यान आरोपीवर विनयभंगाच्या केसेस काही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. २०१५ मध्ये आरोपीने त्याच्या महिला सहकारीबरोबर गैरवर्तन केले आणि जुहू पोलीस ठाण्यात तमाशा केला. जुहू पोलीस ठाण्याच्या मालमत्तेचे नुकसान केले. वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावण्यासाठी चाकू बाळगला. यावरून आरोपीची गुन्हेगारी वृत्ती असल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले. आरोपीचा आक्रमक स्वभाव आणि कलंकित चारित्र्य पाहता प्रतिबंधात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला शिक्षेत दया दाखवण्यास नकार दिला.