शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यास पोलीस कोठडी; शिफ्टिंगचे खोटे बिल केले सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:46 IST

अखेर वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सुभाष वानखेडे याच्याविरोधात फिर्याद दिली होती. ही घटना सांगलीत घडल्याने सांगली शहर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता.

सांगली : ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्याने बदली झालेल्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्यासाठी शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल सादर करून ‘लोकमत’कडून रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ प्रशासनाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संबंधित कर्मचाऱ्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सुभाष महादेवराव वानखेडे (सध्या रा. पंचमुखी मारूती रोड, सांगली, मूळ गाव - म्हाडा कॉलनी, बिल्डिंग नंबर १३, ब्लॉक नंबर ४५, सुरत रेल्वे गेटजवळ, जळगाव) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वानखेडे हे ‘लोकमत’च्या चिपळूण (जि. रत्नागिरी) शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची चिपळूण येथून सांगली कार्यालयात बदली झाली होती. या बदलीनंतर शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल दाखवून कंपनीकडून बिलाची रक्कम उकळण्यात आली होती. प्रशासनाकडे सादर केलेल्या बिलाबाबत शंका आल्याने ‘लोकमत’च्या मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे यांनी बिल सादर केलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीकडे चौकशी केली. यावेळी त्यांनी बिल आम्ही दिलेले नसून, बिलावर उल्लेख केलेले वाहन आमच्या कंपनीचे नसल्याची माहिती ट्रॅव्हल्स कंपनीने लेखी स्वरूपात दिली.

अखेर वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सुभाष वानखेडे याच्याविरोधात फिर्याद दिली होती. ही घटना सांगलीत घडल्याने सांगली शहर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी वानखेडे यास बुधवारी अटक केली व गुरूवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अनंत होळकर हे करीत आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतfraudधोकेबाजीPoliceपोलिस