शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

इंटरनेटद्वारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी केले उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 22:09 IST

चौकशीत हे तीनजण परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ओढत असल्याचं उघडकीस आलं आहे.

ठळक मुद्देगुल्ली नमन यादव (३३), संतोष व्ही यादव (३६), अशोक यादव (३८) अशी या तिघांची नावे या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.सोशल मिडियावर जाहिरात करून त्या खाली संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर टाकायचे.

मुंबई - इंटरनेटवर  Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या पेजद्वारे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलिसांनी पर्दाफाश करून ३ जणांना अटक केली आहे. गुल्ली नमन यादव (३३), संतोष व्ही यादव (३६), अशोक यादव (३८) अशी या तिघांची नावे असून यांच्या समीर यादव या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. चौकशीत हे तीनजण परदेशी महिलांनाही वेश्या व्यवसायात ओढत असल्याचं उघडकीस आलं आहे.अंधेरी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत इंटरनेटवर Mumbai Escort, VIP Celebrity, Hot GF या नावाने भारतीय आणि परदेशातील महिलांच्या मदतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आरोपीच्या मागावर होते. आरोपीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपींशी संपर्क साधला. अंधेरी येथील भगतसिंग काॅलनी, जेबीनगर येथील आखून हाॅटेल राॅयल ईलाइट येथे भेटण्याचं दोघांनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी पाठवलेला ग्राहक हाॅटेलमध्ये आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी तिन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली. या तिघांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. आरोपी मुलीच्या घरची हलाखीची परिस्थिती पैशांचे आमीष दाखवून या व्यवसायात आरोपींनी ओढले. त्यानंतर सोशल मिडियावर जाहिरात करून त्या खाली संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर टाकायचे. त्या मोबाइलवर संपर्क करणाऱ्यांना भारतीय आणि परदेशी महिलांचे फोटो पाठवून आकर्षित केलं जाय असे. या व्यवहारात आरोपी निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवून घ्यायचे. यापूर्वी अशा प्रकरणात तिन्ही आरोपींची नावे पुढे आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबईAndheriअंधेरी