शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, सोनसाखळी चोरी प्रकरणातील सराईत गुंडांना पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 16:38 IST

Crime News : 12 जणांना अटक, 8 गुन्हे उघडकीस

ठळक मुद्दे हे चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या चौकशीत 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. या कारवाईत  पोलीस निरिक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश डांबरे आणि पोलीस उपनिरिक्षक अनंत लांब आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

डोंबिवली: मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरीचे गुन्हे वाढले असताना स्थानिक पोलीसांनी या गुन्हयांचा कसोशिने तपास करीत चोरीच्या प्रकरणातील तब्बल 12 आरोपींना अटक केली आहे. हे चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या चौकशीत 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

कल्याण डोंबिवलीत चोरी, घरफोडी, सशस्त्र दरोडा, सोनसाखळी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली असताना कल्याण पुर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसात 11 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान चोरीच्या वाढलेल्या घटनांवरून स्थानिक पोलीसांनी नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन राबविले त्याचबरोबर रेकॉर्डवरील चोरीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत त्यांची शोध मोहीम राबविली. यात हद्दीत घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, प्राणघातक हल्ला करणा-यांना अटक करण्यात आली आहे. कल्याण शीळ मार्गावर मोबाईल दुकानाचे शटर उचकटून 3 लाख 36 हजार 377 रूपये किमतीचे मोबाईल, एलसीडी टिव्ही असा मुद्देमाल चोरणा-या शहजाद अन्सारी, समीर शेख आणि सद्दाम शेख या तिघांना मुंबई गोवंडी येथून अटक करीत त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेल्या रिक्षासह चोरी केलेला 1 लाख 18 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या गुन्हयात शेहजाद शेख, मुमताज शेख, इम्रान खान, इरफान शेख या चौघांना अटक केली आहे. 

त्यांच्याकडून 10 मोबाईल, लॅपटॉप, म्युझीक सिस्टिम, बॅट-या आणि रोकड असा 62 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्हयातील विनय प्रजापती, सुनिल जैस्वार आणि भावेश भोईर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्हयात वापरलेली रिक्षा असा 1 लाख 7 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 7 नोव्हेंबरला कैलास भंडारी याच्यावर वार करून पसार झालेल्या कृष्णा कुशलकर आणि शुभम पेटेकर या दोघांनाही पुणे येथुन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत  पोलीस निरिक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश डांबरे आणि पोलीस उपनिरिक्षक अनंत लांब आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :ArrestअटकdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरी