शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मी फूड सेफ्टी अधिकारी म्हणत शेकडो व्यापाऱ्यांना गंडा; तोतया FSSAI अधिकारी गजाआड

By गौरी टेंबकर | Updated: December 6, 2022 08:34 IST

कस्तुरबा पोलिसांची कारवाई, आरोपींच्या वहीत त्यांनी फसवलेल्या लोकांचे बिझनेस कार्ड चिकटवून त्यापुढे त्यांचा रिमार्क हे दोघे लिहायचे

मुंबई: गेल्या चार ते पाच वर्षात शेकडो हॉटेल्स, मेडिकल, किराणा शॉपना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) चे अधिकारी असल्याचे सांगत दंडाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या दुकलीला कस्तुरबा पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. यातील मास्टरमाईंड प्राधीकरणाच्या माजी अधिकाऱ्याचे नाव वापरत हा गुन्हा करत असताना एका हॉटेल व्यापाऱ्याने या बनावट  अधिकाऱ्याला ओळखले आणि ही फसवणूक उघडकीस आली. या दोघांना अवघ्या सहा तासात कस्तुरबा पोलिसांनी अटक केले आहे.

वर्धन रमेश साळुंखे उर्फ अविनाश गायकवाड (२८) आणि धर्मेश शिंदे (२५) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे आहेत. यात साळुंखे हा १० वी नापास तर त्याचा सहकारी शिंदे हा बारावी शिकलेला असुन दोघे कांदिवली पूर्व परिसरात राहतात.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी ही दुकली बोरिवली पूर्वच्या राजेंद्र नगर याठिकाणी असलेल्या सेंट्रल  प्रभू हॉटेलचे तेजस हेगडे आणि आरोही हॉटेल मॅनेजर तंगमनी केरमडा यांच्याकडून चार ते पाच हजार रुपये उकळले. मात्र तिसऱ्या ठिकाणी गेल्यावर साळुंखे हा गाडीत बसून होता तर शिंदे याने जाऊन साहेब बाहेर बसले आहेत असे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर व्यक्ती साहेबाला भेटायला बाहेर आला. मात्र सदर व्यक्ती हा अधिकारी नसून भामटा असल्याचे लक्षात आले आणि आरोपीने तिथून पळ काढला.

याची माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निरिक्षक अनिल आव्हाड यांना मिळाली आणि त्यांनी पोलीस निरीक्षक नितीन तडाखे, जगदाळे, , सहायक पोलीस निरीक्षक ओम तोटावर यांच्या नेतृत्वाखाली तीन ते चार पथके नेमत शिंदे आणि साळुंखे यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, एफडीएशी संबंधित फॉर्म, त्यांनी हफ्ता वसुली केल्याची नोंद केलेल्या दोन वह्या व महाराष्ट्र शासन लिहिलेली नेम प्लेट ताब्यात घेतली. 

साहब, कूछ ले दे कर नीपटाव ना?आरोपी ड्रायफ्रुट, मेडिकल, हॉटेल्स, किराणा अन्य दुकानात घुसून तिथे अस्वच्छता, धूम्रपान सारख्या गोष्टींची पडताळणी करत दंडाची रक्कम सांगायचे. तेव्हा आस्थापनाचे चालक मालक हे घाबरून मांडवली करत चार ते पाच हजारात विषय मिटवायचे. त्यामुळे त्यांची कोणी तक्रारही न केल्याने अद्याप ७० ते ८० जणांना यांनी गंडा घातला असावा अशी शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांनी अंधेरी ते दहिसर परिसरात हे प्रकार केल्याचे त्यांच्या नोंदवहीत उल्लेख करण्यात आला आहे. 

आहारकडून पोलिसांचा सत्कार फसवणुकीचा हा प्रकार उघड करणाऱ्या आव्हाड आणि त्यांच्या पथकाचा आहार संघटनेकडून सत्कार करण्यात आला. तर व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे फसू नये असे आवाहन परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले.

नॉट गीव्हन आणि स्मोकिंग बीडी आरोपींच्या वहीत त्यांनी फसवलेल्या लोकांचे बिझनेस कार्ड चिकटवून त्यापुढे त्यांचा रिमार्क हे दोघे लिहायचे. ज्यात पैसे न दिल्यास नॉट गिव्हन आणि दंड आकारल्याचे कारण स्मोकींग बिडी असे देखील लिहिल्याचे सापडले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी