शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सराफाच्या हत्येचा, लुटीचा ३६ तासांत उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 08:55 IST

२० पोलीस अधिकारी, ७० अंमलदारांचे प्रयत्न; ५०० हून जास्त सीसीटीव्ही तपासले

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : साक्षी ज्वेलर्स मालकाची शनिवारी दिवसाढवळ्या हत्या व लूट केल्याप्रकरणी २० अधिकारी, ७० पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी ३६ तासांमध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नालासोपारा ते चर्चगेट रेल्वे स्थानकांवरील ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले. आरोपींनी ही हत्या लुटीसाठी केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. एसटी डेपो रोडवरील किशोर जैन (४८) यांची शनिवारी सकाळी दोन आरोपींनी दुकानात घुसून हत्या केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा मास्टरमाइंड जॉन्सन बाप्टिस्ट (४२) आणि अफजल खान (३३) या दोघांना नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमधून अटक केली आहे. दोन्ही आरोपी इलेक्ट्रिशियन असून जॉन्सन याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. सराफ दुकानात एकटा असल्याचे जॉन्सनने बघितल्यावर चोरीचा प्लॅन आखला होता. एकावेळी प्रयत्न केला, पण त्या दिवशी दुकानात गर्दी होती. शनिवारी कोणी नसताना चोरी करण्यासाठी दोघांनी प्रवेश केला. हत्या झाल्यानंतर दोघेही आरोपी नालासोपारा रेल्वे स्थानकांकडे चालत गेले. नंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वेगवेगळ्या डब्यात बसून मुंबई सेंट्रलला उतरले व नंतर परत ट्रेनने नालासोपारा येथील घरी आले. सोमवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन ते सव्वा दोन किलो चांदी पकडल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे पैसे नसल्याच्या कारणावरून आरोपी जॉन्सन मागील एक ते दीड महिन्यापासून या साक्षी ज्वेलर्स दुकानाची रेकी करत होता. दुकान मालकाने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडून पूजा केल्यावर दोन्ही आरोपींनी दुकानात घुसून हत्या केली आहे. १६ पथकांनी अतिजलद तपास करून दोन्ही आरोपींना प्रगतीनगरमधून सोमवारी दुपारी अटक केली. - डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे विभाग, पोलीस आयुक्तालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी