शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पोलिसांची ३० रोडरोमिओंवर कारवाई; ‘लोकमत’च्या स्टींगची पोलिसांकडून गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:11 IST

शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणले.

जालना : शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून आज समोर आणले होते. याची जालना पोलिसांनी गंभीर दखल घेत रोडरोमिओंविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली. पहिल्याच दिवशी तब्बल ३० रोमिओंवर कारवाई केली. पहिल्यांदाच पकडलेल्याने रोमिओंना समज देण्यात आली. परंतु पुन्हा सापडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

जालना शहरात मागील काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय, शिकवणीत जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढली जात होते. तसेच बसस्थानक, नवीन वसाहत परिसर, मोती बाग परिसर, उड्डाणपूल परिसर आदी भागात मुलींना आधिक त्रास होत होत होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने शनिवारी सर्वत्र फिरून सत्य परिस्थिती जाणून घेतली. हा प्रकार खरा असल्याचे दिसले. त्यानंतर ‘रोमिओंचा कट्टा; मुलींची थट्टा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि शनिवारी सकाळपासून कारवायांची मोहीम हाती घेण्यात आली.

पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखली अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे आपल्या विशेष पथकांना घेऊन स्वत: रस्त्यावर उतरले. पहिल्याच दिवशी विविध भागात जावून त्यांनी तब्बल ३० रोडरोमिओंवर कारवाई केली. या सर्वांना समज देऊन सोडण्यात आले. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल घेत अपर अधीक्षक पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, दामिनी पथक, डीबी पथक यांना कारवाईचे आदेश दिले होते. तसेच सर्व पोलीस ठाणे प्रमुखांनाही कारवाया संदर्भात आदेशित करून रस्त्यावर उतरण्यास सांगितले होते. दिवसभर ही धरपडक सुरूच होती. यामुळे छेड काढणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

सोमवारपासून जिल्ह्यात मोहीमपहिल्या दिवशी जालना शहरात कारवाया करण्यात आल्या. परंतु रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सोमवारपासून जिल्हाभरात मोहीम राबविली जाणार आहे. मुलींनीही न घाबरता या रोमिओंविरोधात तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोहीम गतिमान करणार ३० रोमिओंना ताब्यात घेत समज देऊन सोडले. पुन्हा सापडल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल. ही मोहीम अधिक गतीमान करण्यासाठी सर्व ठाणे प्रमुखांना आदेश दिले आहेत. मुलींनीही त्रास होत असेल तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गुपीत ठेवले जाईल. सोमवारपासून जिल्हाभर कारवाया केल्या जातील. - समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :JalanaजालनाJalna Policeजालना पोलीसCrimeगुन्हा