शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

MBA तरुणी पडली सहावी पास तरुणाच्या प्रेमात, लग्न केलं अन्...; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 11:52 IST

पंजाब नॅशनल बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजधानी जयपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आत्महत्येनंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये "पती माझा आणि मुलीचा तिरस्कार करतो. म्हणून मी वैतागून जाते आहे" असं म्हटलं आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरभी कुमावत (30) असं आत्महत्या केलेल्या महिला बँक अधिकाऱ्याचं नाव आहे. ती पंजाब नॅशनल बँकेत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होती. सुरभीने गळफास घेतल्याची माहिती तिच्या पतीनेच पोलिसांना दिली. नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार. 2016 मध्ये सुरतभीचं लग्न झालं. तिने साहिद अलीसोबत प्रेम विवाह केला. कुटुंबीयांचा लग्नासाठी नकार असल्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने हे लग्न केलं. 

धक्कादायक बाब म्हणजे सुरभीने MBA केलं आहे. तर तिचा नवरा फक्त सहावी पास आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करताना सुरभीची साहिद अलीसोबत ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2016 मध्ये सुरभी आणि साहिद अलीने गाझियाबादला जाऊन आर्य समाजात लग्न केले. ती पत्नी आणि मुलीसह राहत होती. 

पोलीस चौकशीत शाहिदने सांगितले की, तो शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून पत्नी आणि मुलीसोबत परतला होता. त्यानंतर ते तिघेही खोलीत झोपले. रात्री उशिरा सुरभी दुसऱ्या खोलीत गेली. तिथे तिने गळफास घेतला. त्याने सकाळी सुरभीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरभीच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी