शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नागपुरात मुलगा बनून हडपला विधवा महिलेचा प्लॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:07 IST

प्रॉपर्टी डीलरने बनावट कागदपत्रांच्या मदतीने विधवा महिलेचा प्लॉट विकून तिची फसवणूक केली आहे. वाठोडा पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे.

ठळक मुद्देप्रॉपर्टी डीलरसह चौघांचा समावेश : वर्षभरानंतर गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रॉपर्टी डीलरने बनावट कागदपत्रांच्या मदतीने विधवा महिलेचा प्लॉट विकून तिची फसवणूक केली आहे. वाठोडा पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे.फसवणुकीचा मुख्य सूत्रधार भीमराव सागर वागदे (३४) रा. रुही पांजरा, वर्धा मार्ग हा आहे. वागदेने अशोक वंजारी, चंदननगर, विकास जेम्स चौरे, इंदिरानगर इमामवाडा आणि एका साथीदाराच्या मदतीने महिलेचा प्लॉट विकला. ७५ वर्षाच्या भावना सुधाकर कुळकर्णी यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. ती पुण्यात राहते. त्यांचा पुतण्या नागपुरात राहतो. भावनाचा वाठोडाच्या आराधना नगरात प्लॉट आहे. त्यांचा कुणीच वारसदार नसल्यामुळे हा प्लॉट कुणाच्याच नावे केला नव्हता. भावनाचा पुतण्या वकील आहे. वर्षभरापूर्वी भावना पुतण्याला भेटण्यासाठी नागपुरात आल्या. त्यांनी पुतण्याला आराधना नगरात प्लॉट असून तेथे चलण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यावर भावनाला प्लॉटच्या ठिकाणी घर बांधलेले दिसले. त्यांना धक्का बसला. प्लॉटवर संदीप मोहाडीकर या व्यक्तीने घर बांधले होते. मोहाडीकरची चौकशी केली असता त्याने प्लॉट कथित राजेश सुधाकर कुळकर्णीकडून २१.७५ लाखात खरेदी केल्याचे सांगितले. भावनाने नंदनवन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. नंदनवन पोलिसांनी बराच काळ तपास प्रलंबित ठेवला. दरम्यान वाठोडा ठाणे सुरु झाल्यामुळे हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. उपनिरीक्षक अर्चना वाघमारे, हवालदार अरुण बांते यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात वागदे आणि त्याच्या साथीदारांची खरी हकीकत समोर आली. वागदे प्रॉपर्टी डीलर आहे. त्याने योजना आखून या प्लॉटची विक्री केली. तो बऱ्याच काळापासून रिकाम्या प्लॉटचा शोध घेत होता. शासकीय कार्यालयातून त्याच्या मालकाची माहिती गोळा करतो. प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून तो विकतो. पुण्याला स्थायिक झाल्यामुळे भावना यांचे प्लॉटवर येणे-जाणे नव्हते. याचा फायदा घेऊन वागदेने कथित राजेश सुधाकर कुळकर्णीला भावनाचा मुलगा म्हणून दाखविले आणि प्लॉटची विक्री केली. वागदेचे साथीदार अश्विन वंजारी, विकास चौरे यांनी राजेश कुळकर्णी भावनाचा मुलगा असल्याची पुष्टी करून साक्ष दिली. त्या आधारे वाठोडा पोलिसांनी वागदे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी