शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापूर्वी सचिनकडे पाहिले पिस्टल; शुभम सुरळेने तपास यंत्रणेला दिली माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:05 IST

रोहित रेगेच्या घरातून जप्त केलेले ‘ते’ पिस्टल मागील दीड वर्षापूर्वीच सचिन अंदुरेकडे पाहिल्याचे शुभम सुरळे याने तपास यंत्रणेला सांगितले

ठळक मुद्देविनापरवाना शस्त्रे प्रकरणी पथकाचा कसून तपास अटकेतील  तिघांकडून माहिती घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न

औरंगाबाद :  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कटातील संशयित आरोपी रोहित रेगेच्या घरातून जप्त केलेले ‘ते’ पिस्टल मागील दीड वर्षापूर्वीच सचिन अंदुरेकडे पाहिल्याचे शुभम सुरळे याने तपास यंत्रणेला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ही घातक शस्त्रे विनापरवाना बाळगण्याचा आरोपींचा आणखी काय उद्देश होता, हे शोधून काढण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

डॉ. दाभोलकर हत्येची पाळेमुळे खोदण्यावर सीबीआय व एटीएसच्या पथकांनी भर दिला असून, अटकेतील संशयित, रोहित, शुभम व अजिंक्य या आरोपींना बोलते करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. बुधवारी पहाटे अटक केलेले तिन्ही आरोपी सध्या कोठडीत आहेत. शुभमने पोलिसांना सांगितल्यानुसार त्याने ते पिस्टल दीड वर्षांपूर्वी सचिनकडे पाहिलेय, त्याने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळली जात आहे.  

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरलेल्या ‘मोडस् आॅपरेंडी’त साम्य आहे. त्यामुळे हेच पिस्टल चारही गुन्ह्यांत वापरले गेले काय? किती गोळ्या वापरल्या? हत्या घडल्या तेथील घटनास्थळाचे मिळालेले फुटेज, पंचनामे यादृष्टीनेदेखील

सीबीआयची पथके तपास करीत आहेत. औरंगाबादेत सचिनचे वर्षानुवर्षे घातक शस्त्र सांभाळणे व नंतर विल्हेवाट करण्यासाठी साला शुभमकडे दिल्यानंतर त्याची कुठेही वाच्यता न करता खबरदारी बाळगली जाणे. या घटनेत नेमके काय-काय दडलेय, पिस्टलचा प्रवास तिघांकडे कसा झाला, त्यावरून एक-एक साखळी तपास पथक जोडत चालले आहे.  शुक्रवारी  तिघांचीही पोलीस कोठडी संपत असून, सिटीचौक पोलीस त्यांना उद्या न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाढीव कोठडीसाठी पोलीस तपासातील काही नवीन मुद्दे  सादर करण्यात येणार असल्याचे कळते.