शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 20:12 IST

Rape Case युवतीला २९ जुलै २०१९ रोजी लग्नाचे आमिष देऊन घरी नेले व युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ठळक मुद्देसंग्रामपूर तालुक्यातील एका आदिवासी गावात हा प्रकार घडला.

संग्रामपूर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीच्या इच्छेविरुद्ध सतत लैंगिक शोषण करणाऱ्या एका आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांसह तीन आरोपींवर सोनाळा पोलीस स्टेशनला सोमवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील एका आदिवासी गावात हा प्रकार घडला. २२ वर्षीय युवतीला सन २०१७ पासून गावातीलच युवकाने लग्नाचे आमिष देत इच्छा नसताना लैंगिक शोषण केले. आरोपी आदिल अब्बास सुरत्ने याने पीडित युवतीला २९ जुलै २०१९ रोजी लग्नाचे आमिष देऊन घरी नेले. त्या दरम्यानसुद्धा आरोपीने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेत आरोपीला त्याचे भाऊ अबुजर अब्बास सुरत्ने, आबिद अब्बास सुरत्ने या दोघांनी मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही बाब युवतीच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोनाळा पोलीस स्टेशन गाठले. मात्र काही प्रतिष्ठित नागरिकांनी पीडित युवतीच्या घरच्यांची समजूत काढून आरोपी आदिल सुरत्नेसोबत लग्न लावून देण्याचे ठरविले होते. ३० जुलै २०१९ ला नोटरीच्या माध्यमातून आपसी करारनाम्यात २ जानेवारी २०२० ला लग्न ठरविण्यात आले. या नोटरीवरील करारनाम्यावर आरोपी, प्रतिष्ठित मध्यस्थींच्या छायाचित्रांसह सह्या आहेत. आपसी करारनाम्यात ठरल्याप्रमाणे २ जानेवारी २०२० ला लग्नाच्या दिवशी आरोपी हजर झाला नाही. याबाबत युवतीच्या नातेवाइकांनी आरोपीच्या कुटुबीयांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीला बाहेरगावी पाठवले. या सर्व प्रकरणात आरोपीला कुटुंबातील दोघांनी पाठबळ दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. युवतीच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस स्टेशनला आरोपी आदिल सुरत्ने व मदत करणारे अबुजर सुरत्ने, आबिद सुरत्ने या तिघांवर कलम ३७६(२)(n), ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangrampurसंग्रामपूर