शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या फरार आरोपींची छायाचित्र प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:49 IST

दोन फरार आरोपीच्या शोधात तुळींज पोलीस, माहिती देणार्‍यास बक्षीस

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा:- शहरामध्ये रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन फरार आरोपींचा शोध तुळींज पोलीस करत आहे. दोन्ही आरोपींची सीसीटीव्हीत कैद झालेले छायाचित्रे प्रसिद्ध करून आरोपींची माहिती देण्याचे आव्हान करून त्यांची योग्य माहिती देणार्‍यास पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे.

नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन घडलेल्या घटनांबाबत दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबरला तर दुसरी घटना १५ नोव्हेंबरला घडली आहे. यामध्ये ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा दोन आरोपींनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केला आहे. या मुलींनी घडलेली घटना घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती तुळींजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन घटनांमुळे पालकांमध्ये घबराट आणि चिंतेचं वातावरण पसरले आहे. पालकांनी आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

कोट

१) या दोन्ही फरार व विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथके बनवली आहेत. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावली आहेत. त्यांची माहिती देणार्‍यास बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. - शैलैंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी