शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

मुख्याधिकाऱ्यांसमक्ष घेतले अंगावर पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 21:37 IST

अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला.

परतवाडा - अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर पोलिसांच्या निर्देशानंतर तो इसम पोलीस ठाण्यात पोहचला.विशेष रस्ते विकास निधीअंतर्गत दोन-चार दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले. यासाठी त्याने रस्त्या मोकळा करण्यासाठी साईडला असलेले अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण काढण्यात आले. दुरानी चौकातील एका पेट्रोलपंपजवळ गजराजसह अधिकारी पोहचले. तेथे पेट्रोलपंपशी संबंधित एका इसमाने गजराज न चालविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली. पेट्रोलपंपलगत रस्त्यावर डांबर नको. हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे तेथे पेव्हींग ब्लॉक बसवलेत. अशी आग्रही मागणी मुख्याधिकाऱ्यांपुढे ठेवली. यादरम्यान शाब्दिक चकमकही घडली. नगरपालिकेने टाकलेली चुण्याची लाईन बघून पेट्रोलची बाटली त्या इसमाने जवळ घेतली. त्यातील काही पेट्रोल अंगावरसुद्धा घेतले. या संपूर्ण घटनाक्रमाचे नगरपरिषदेकडून व्हिडीओ शुटींगही केले गेले.नगरपरिषदेला दंडयापूर्वी मुख्याधिकारी गणेश देशमुख व एसडीओ अरुण डोंगरे हे असताना याच दुरानी चौकातील अतिक्रमण काढण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला होता. तेव्हा नगर परिषदेचे काही कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. संबंधितांनी हे प्रकरण न्यायालयात पोहचविले. यात न्यायालयाने लाखो रुपयांची पेनॉल्टी नगरपरिषदेवर ठोकली होती.रस्त्याचा मध्य काढारस्त्याचे काम करताना रस्त्याचा मध्य काढा. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुने सारखे अंतर घेऊन मग नगरपरिषदेने गजराज फिरवावा. अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव करू नये. सरसकट एका लाईनमध्ये अतिक्रमण काढावे, अशी न्याय्य मागणी नागरिकांनी केली आहे.पेट्रोलपंपाशी संबंधित व्यक्तीने शाब्दिक वाद गालत अंगावर पेट्रोल घेण्याचाही प्रयत्न केला. संबंधितास असलेले आवश्यक दस्तऐवज सादर करण्यास सुचविले आहे. घटनेच्या अनुषंगाने लिखित तक्रार केलेली नाही. दस्तऐवज बघून पुढील कारवाई निश्चित करू.- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर नगरपालिका

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी