शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्या महिलेला आरोपी करण्यासाठी आरोपीची न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:50 IST

अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४१७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट याने जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने जुने शहर पोलिसांना नोटीस बजावली असून, त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. यासंदर्भात न्यायालयाने जुने शहर पोलिसांना नोटीस बजावली असून, त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट याने जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेनुसार ‘ट्रान्सप्लान्टेशन आॅफ आॅर्गेन्स टिशू अ‍ॅक्ट’ १९९४ नुसार किडनी खरेदी करणारा व मध्यस्थी करणाऱ्यासोबतच विकणाºयाविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध होत असेल, तर आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून, एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. या कलमानुसार तक्रार करणारी महिलाही तेवढीच दोषी आहे. म्हणून तिलाही आरोपी करण्यात यावे, ही याचिका न्यायालयाने विचारात घेतल्यानंतर जुने शहर पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात राहुल नगरातील हरिहरपेठ येथील निवासी शांताबाई रामदास खरात यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार आरोपी देवेंद्र सिरसाटने शांताबाई खरातला उधार पैसे मागितल्यानंतर त्याने म्हटले होते, की जर किडनी विकली, तर एका किडनीच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील. या आमिषाला बळी पळून त्याने शांताबाईची भेट बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी करून दिली होती. त्यानंतर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नांदुरा येथील झांबड यास किडनी प्रत्यारोपण करण्यात आले; मात्र पवार व सिरसाट यांनी शांताबाई यांना पाच लाख रुपयांऐवजी तीन लाख रुपये दिले होते. त्यामुळे फसवणूक झाली म्हणून शांताबाईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४१७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. आणखी एक तक्रारकर्ता समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर कलम ४६५, ४६८, ४७१, ३७० वाढविले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन