शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:47 IST

Bombay High Court dismisses two petitions against the film 'Gangubai Kathiawadi' : केवळ या चित्रपटातील तीन आक्षेपार्ह शब्द हटविण्याची विनंती याचिकादारांनी केली आहे.

मुंबई : आलिया भटच्या वादग्रस्त ठरलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘कामाठीपुरा’, ‘काठियावाडी’ आणि ‘चायना’ हे तीन शब्द हटवण्यासंदर्भात करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळल्या.काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, हितेन मेहता यांनी स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या होत्या. तर कामाठीपुराच्या रहिवासी श्रद्धा सुर्वे यांनी रिट याचिका दाखल केली होती. या तिन्ही याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होत्या.  हा चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती द्यावी, अशी कोणीही मागणी केली नाही. केवळ या चित्रपटातील तीन आक्षेपार्ह शब्द हटविण्याची विनंती याचिकादारांनी केली आहे.

सुर्वे यांनी याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटात कामाठीपुराचे नाव घेऊन या ठिकाणी राहणाºया लोकांची बदनामी होईल. पूर्वी येथे वेश्यालये होती. पण आता तसे नाही. तर पटेल यांची वकील धृती कपाडिया यांनी न्यायालयाला सांगितले की, चित्रपटात ‘काठियावाडी’ आणि ‘कामाठीपुरा’ हे शब्द वापरून लोकांच्या भावनांचा दुखावण्यात आल्या आहेत. कामाठीपुरातील अनेक रहिवाशांनी पटेल यांना पत्र लिहून या चित्रपटातून ‘कामाठीपुरा’ हा शब्द हटविण्याची विनंती केली आहे. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे संपूर्ण कामाठीपुरा हा ‘रेड लाईट’ चा भाग नाही. तर मेहता यांच्या वकिलांनी चायना या शब्दावर आक्षेप घेतला.

या तिन्ही याचिकांवर संजय लीला भन्साळी यांच्यातर्फे जेष्ठ वकील रवी कदम यांनी केला. या तिन्ही याचिका चुकीच्या समजावर दाखल करण्यात आल्या आहेत. या चित्रपटात १९५० चा काळ दाखविण्यात आला आहे. त्याकाळात त्या भागात चायनाचे अनेक डेन्टिस्ट होेते. त्यांना उद्देशून हा शब्द  वापरण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे की, हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावण्यासाठी नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली आहे, असा युक्तिवाद कदम यांनी केला. न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद केल्यानंतर तिन्ही याचिका फेटाळल्या

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसMumbaiमुंबई