शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

क्रिकेटच्या मैदानात सुरू झाली खुन्नस; बॉल, बॅटऐवजी चालला चाकू, आरोपी जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: August 6, 2023 18:40 IST

दोन आठवड्यांपूर्वी कट, फ्लिपकार्टवरून चाकूची खरेदी, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: क्रिकेटच्या मैदानातून निर्माण झालेली खुन्नस भलत्याच वळणावर गेली. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणारे युवा खेळाडू पीचवर बॅटिंग, बॉलिंग करण्याऐवजी कटकारस्थान करण्यात गुंतले. एवढेच काय, त्यांनी प्रतिस्पर्धी संघातील एका युवकावर चायनिज चाकूने हल्ला चढवला. त्यानंतर भरधाव ट्रेन पकडून आरोपी नागपुरात पळून आले. मात्र, पोलिसांनी त्यांचा ऑनलाइन पाठलाग करून अवघ्या काही तासातच त्यांना जेरबंद करत त्यांचा त्रिफळा उडवला.

एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा, अशी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील होय. या घटनेतील फरार आरोपींच्या नागपूर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे पोलिसांनी मुसक्या बांधल्या. यानंतर प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीतून पोलिसही चक्रावले.

आशीष, परवेज आणि करण अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व राजूरा (जि. चंद्रपूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. १८ ते २२ वयोगटातील या युवकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांचे शिक्षणही फारसे नाही. मात्र, ज्या पद्धतीने त्यांनी कटकारस्थान करून गुन्हा केला, ती पद्धत चक्रावून टाकणारी आहे.

एकाच परिसरात राहणाऱ्या तरुणांसोबत ते क्रिकेट खेळायचे. प्रतिस्पर्धी संघातील एक खेळाडू त्यांना नेहमी डिवचत होता. मात देण्याचा प्रयत्न करत होता. त्याला चांगली बॉलिंग, बॅटिंग करून प्रत्युत्तर देण्याऐवजी आरोपींनी भलतेच कट कारस्थान रचले. त्याला धडा शिकविण्यासाठी आरोपींनी फ्लिपकार्टवरून चाकूची मागणी नोंदवली. ऑनलाइन चाकू आल्यानंतर त्या तरुणाला एकटे गाठले आणि त्याच्यावर चाकू हल्ला करून जबर जखमी केले. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे चंद्रपूर रेल्वेस्थानक गाठले. तेथून ट्रेन पकडून ते नागपूरला पळून आले.

पळून आले अन् गजाआड झाले

तिकडे जखमी तरुणाने दिलेल्या बयाणावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे लोकेशन ट्रेस केले. ते रेल्वेने नागपूरला पळून गेल्याचे कळताच चंद्रपूर पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांना त्यांचे फोटो, नंबर पाठविले. त्या आधारे येथील रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद तसेच पोलिस उपनिरीक्षक झुरमुरे, पोलिस हवालदार धनदर, नायक डोळस, कॉन्स्टेबल धोंगडी आणि कॉन्स्टेबल अडकणे यांनी आरोपींना शोधून त्यांच्या रेल्वेस्थानक परिसरात त्यांच्या मुसक्या बांधल्या.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरArrestअटक