शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

६६० बेशिस्त रिक्षाचालकांसह १६९१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:50 IST

पारदर्शी कारवाईसाठी ई चलन; ४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल

ठळक मुद्दे विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीपासून ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार ठेवण्यासही सहकार्य होत असल्याचा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

डोंबिवली - शहारातील १६९१ बेशिस्त रिक्षा चालकांसह अन्य दुचाकी व चारचाकी वाहनांनी नियम तोडल्याकारणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फेब्रुवारी महिन्यात एकूण ४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीपासून ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.ठाणे पोलीस आयुक्तालयामधून आलेल्या आदेशांनूसार एकही दंडात्मक कारवाई ही ई चलनाशिवाय होता कामा नये, त्याचे पालन करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतेज जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले की, १०३१ दुचाकी, चारचाकी चालकांकडून २ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर ६६० बेशिस्त रिक्षा चालकांकडून १ लाख ६२ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये गणवेश न घालणारे १३७, फ्रंट सीट ४५, स्टँडवर ऊभे न राहता वाहतूक कोंडीत भर घालणा-या ३१० रिक्षा चालकांचा त्यात समावेश आहे. लायसन नसणे ८०, लायसन जवळ नसणे २५, रोडवर पार्किंग ३५, नो एंट्रीतून रिक्षा चालवणे १४, बीज नसणे ०८, विद्यार्थी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ०३ वाहनचालकांवर, तसेच भाडे नाकारणा-या ०२ रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ही सर्व दंडात्मक कारवाई ई चलनद्वारे करण्यात आल्याने संबंधित वाहनचालकांचा पूर्वीचा दंड असेल तर, तसेच या आधीही काही कारवाई झालेली असेल तर तो सर्व तपशील त्यात मिळतो. जेणेकरून कारवाई करतांना कठोर निर्णय घ्यायचा की नाही यावर विचार विनिमय करणे सोपे जाते. वरिष्ठांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार ठेवण्यासही सहकार्य होत असल्याचा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.* भाडे नाकारणा-या रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांनी थेट वाहतूक नियंत्रण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन जाधव यांनी केले. मुजोरी करणे, उद्धट वर्तन करणे अशा सर्वांवर कारवाई होणारच असा पवित्रा घेत जाधव म्हणाले की, शहरातील सुमारे ३० रिक्षाचालकांचे लायसन रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव आरटीओ, कल्याण अधिका-यांकडे पाठवला असून लवकरच त्यावर निर्णय येण्याची प्रतिक्षा आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसdombivaliडोंबिवली