शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवास हत्याकांडातील आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:40 IST

बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.

नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.

श्रीवास प्रकरण उघड झाल्यापासून बागडे फरार होता. तो गँगस्टर रणजीत सफेलकर टोळीतील मुख्य गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मृत मनीष श्रीवास, छोटू बागडे आणि इशाक मस्ते हे तिघे खास मित्र होते. ते सफेलकर टोळीत सक्रिय होते. धोका निर्माण झाल्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला होता. त्यानुसार बागडेने ३ मार्च २०१२ ला रात्री मनीषला 'मस्त माल आणला आहे', असे सांगून कारमध्ये बसवले. ते पवनगावच्या एका फार्महाऊसवर गेले. तेथे रणजीत सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो यांनी मनीषवर शस्त्राचे सपासप  घालून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दरीत फेकले.२०१२ च्या या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी तबबल ९ वर्षांनी केला. त्यात सफेलकरसह आतापावेतो सात जणांना अटक केली. छोटू बागडे मात्र फरार होता.  रविवारी पहाटे  उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी युनिट तीनच्या पथकाकडून त्याला पाचपावलीत नाट्यमयरित्या अटक केली. सोमवारी त्याला न्या. व. भ. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी केली. सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बागडेला २८ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.---आणखी गुन्हे उघड होणार ?सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांना पोलिसांनी वेगवेगळ्या तारखेला अटक केली. प्रत्येकाच्या चौकशीतून कोणता ना कोणता मोठा गंभीर गुन्हा उघड झाला. बागडेच्या पीसीआर मधूनही आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता पोलिस अधिकारी वर्तवित आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बी. एन. नलावडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी