शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:24 IST

जामीन अटींत सुधारणा.

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या दोन डॉक्टरांच्या जामीन अटींमध्ये उच्च न्यायालयाने अंशत: सुधारणा करत दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी दिली. मात्र, तेथे जाण्यापूर्वी त्यांना त्यांच्या प्रस्तावित राहत्या घराचा पत्ता, मोबाइल नंबर देण्याचे निर्देशही आरोपींना दिले.आरोपी डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी जामीन अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे होती. नायर रुग्णालयात घेत असलेले पदव्युत्तर  वैद्यकीय अभ्यासक्रमाची मुदत १० डिसेंबर रोजी संपत असल्याने या दोन्ही आरोपी रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहू शकत नाहीत. तसेच त्यांना मुंबईत अन्य ठिकाणी राहणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींची सशर्त जामिनावर सुटका केली. त्यात त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून न जाण्याचीही अट घालण्यात आली होती. या अटीत सुधारणा करावी, यासाठी भक्ती व अंकिता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे.मात्र, सरकारी वकिलांनी या अर्जावर आक्षेप घेतला. या दोघी मूळगावी परतल्या तर खटल्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे खटल्यास विलंब होईल व तोपर्यंत अन्य साक्षीदार कॉलेज सोडून जाऊ शकतात, असे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने त्या दोघींना खटल्यास उपस्थित राहण्यासंदर्भात हमी देण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्या प्रस्तावित राहत्या ठिकाणचा पत्ता व मोबाइल नंबरही देण्याचे निर्देश दिले.काय आहे प्रकरण ?पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भक्ती, अंकिता व आणखी एका डॉक्टरला मुंबई पोलिसांनी २०१९ मध्ये अटक केली. तसेच रॅगिंग ॲक्टअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.  त्याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविला. 

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीdoctorडॉक्टर