शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल पाहतो म्हणून पालक ओरडले, १२ वर्षांच्या मुलाने घर सोडले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 07:18 IST

अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला.

मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला. 

अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.  

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले.   वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

केमिस्टकडून चिप्स घेऊन खाल्लेरात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहतो म्हणून त्याच्या आईने तो काढून घेतला होता. त्या रागात तो निघून गेल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पहाटे उठून त्याने झोपेत अंगावर दोन ते तीन टी शर्ट घातले आणि जवळच्या केमिस्टकडे जात शीतपेय व चिप्स घेऊन खाल्ले, अशीही माहिती आहे. दरम्यान, मुलगा सुखरूप सापडल्याने आम्ही आता ही फाईल बंद करणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सिराज इनामदार यांनी सांगितले. मुलाच्या वडिलांनी मुलाला शोधण्यात मदत केल्याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, म्हेत्रे तसेच इनामदार आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.

मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला. अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परततताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.  गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले.   वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

केमिस्टकडून चिप्स घेऊन खाल्लेरात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहतो म्हणून त्याच्या आईने तो काढून घेतला होता. त्या रागात तो निघून गेल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पहाटे उठून त्याने झोपेत अंगावर दोन ते तीन टी शर्ट घातले आणि जवळच्या केमिस्टकडे जात शीतपेय व चिप्स घेऊन खाल्ले, अशीही माहिती आहे. दरम्यान, मुलगा सुखरूप सापडल्याने आम्ही आता ही फाईल बंद करणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सिराज इनामदार यांनी सांगितले. मुलाच्या वडिलांनी मुलाला शोधण्यात मदत केल्याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, म्हेत्रे तसेच इनामदार आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी