शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

Video : परभणीतील एटीएम केंद्र जळाले नसून जाळले; दोन मशीनमध्ये होते २३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 18:59 IST

ज्वलनशील द्रव्य टाकून माथेफिरूने लावली आग

ठळक मुद्दे१३ लाख रुपयांचे नुकसानबँक अधिकाऱ्याची तक्रार

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील एटीएम केंद्राला आग लागली नसून एका माथेफिरूने ही आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले असून, या घटनेत १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार बँक अधिकाऱ्याने नवा मोंढा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर स्टेट बँकेच्या एटीएम केंद्राला ४ डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार चौधरी, चारूदत्त पी. विश्वासराव, गंगाप्रसाद साधू, कालिदास रणदिवे, दुलालचंद्र मंडल, शेख अमजद, सरदार खान, रमेश खवले, विश्वास खोले या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर शैलेंद्रकुमार चौधरी यांनी नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, एक व्यक्ती हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टीकची कॅन घेऊन एका खोलीतील दोन्ही एटीएम मशीनवर कॅनमधील ज्वलनशील द्रव्य टाकून आग लावून बाहेर येताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने डोक्यावर आणि तोंडावर पांढरा रुमाल बांधलेला असून, निळ्या रंगाचे जॅकेट व फिकट निळ्या रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. 

या घटनेत दोन एटीएम मशीन अंदाजे १० लाख रुपये, फर्निचर, युपीएस  ३ लाख रुपये असे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट तपास करीत आहेत. या प्रकरणात तपास सुरू असून, आरोपीला शोधण्यात लवकरच यश मिळेल, असे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी सांगितले.

एटीएममध्ये २३ लाखांची रक्कमइंडिया बँकेच्या या एटीएम केंद्रातील एका मशीनमध्ये ३ डिसेंबर रोजी २० लाख रुपये जमा करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या मशीनमध्ये २७ नोव्हेंबर रोजी २२ लाख रुपये जमा केले होते. ४ डिसेंबर रोजी पहिल्या मशीनमध्ये १९ लाख ३५ हजार ८०० रुपये आणि दुसऱ्या मशीनमध्ये ३ लाख ६२ हजार ७०० रुपये असे एकूण २२ लाख ९८ हजार ५०० रुपये शिल्लक होते. मात्र या पैकी किती रक्कम जळाली ही माहिती मशीन उघडल्यानंतरच स्पष्ट होईल, असे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमfireआगparabhaniपरभणीMONEYपैसा