शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Anil Deshmukh Arrested: परमबीर सिंहांचा ‘लेटरबॉम्ब’ ते अनिल देशमुखांचे ईडीसमोर हजर होणे; आजवर काय काय घडले, एका क्लिकवर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 08:00 IST

What progress in Anil Deshmukh's Case till now: परमबीर सिंह  यांनी २० मार्चला मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना  पत्र  लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला देण्यात आले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्याने नाराज झालेल्या  परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने  अनिल देशमुख यांना  गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचबरोबर त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) व  सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर (ईडी) पोहोचविले. 

परमबीर सिंह  यांनी २० मार्चला मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना  पत्र  लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या पत्रानुसार कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ  सहायक  निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचे युनिट हेड  होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले.

देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत व त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असे या पत्रात नमूद केले होते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात निर्देश द्यायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप  परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.

देशमुखांचा राजीनामा ते पुन्हा प्रकटणे...१८ मार्च : ‘लोकमत’च्या इयर ऑफ द महाराष्ट्रीयन पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची बदली केल्याचे वक्तव्य२० मार्च  : परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.५ एप्रिल : देशमुखांचा राजीनामा.१० मे : ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरुद्ध ईसी आयआर  दाखल केला.२६ जून : ईडीचे पहिले समन्स२९ जून : ईडीचे दुसरे समन्स ५ जुलै : ईडीचे तिसरे समन्स १६ जुलै : ईडीचे चौथे समन्स.१७ ऑगस्ट : ईडीचे पाचवे समन्स.२ सप्टेंबर :  देशमुख यांची समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात२९ ऑक्टोबर :  समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.१ नोव्हेंबर : देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंग