शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:31 IST

Parambir Singh : सीआयडीने जारी केलेल्या नोटीसनंतर सिंग दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात पोहोचले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या खंडणीच्या दोन गुन्ह्यांसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.सीआयडीने जारी केलेल्या नोटीसनंतर सिंग दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात पोहोचले. सिंग यांच्याविरुद्ध दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडी ही एजन्सी करत आहे.सीआयडीने यापूर्वी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली होती. नुकतेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले. सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने या वर्षी मार्चमध्ये न्यायमूर्ती के यू चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती.पॅनेलने यापूर्वी सिंग यांना आयोगासमोर हजर न राहिल्याबद्दल अनेक वेळा दंड ठोठावला होता आणि त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. सिंग यांना यापूर्वी खंडणीच्या एका खटल्यात न्यायालयाने फरार घोषित केले होते, चंदीगडहून परतल्यानंतर सहा महिन्यांनी गेल्या गुरुवारी सिंग मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ च्या कार्यालयात हजर झाले आणि त्यांनी जबाब नोंदवला.सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.शुक्रवारी सिंग एका स्थानिक बिल्डरच्या तक्रारीवरून त्यांच्या आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात ठाणे पोलिसांसमोर हजर झाले. परमबीर सिंग या आयपीएस अधिकाऱ्यावर महाराष्ट्रात किमान पाच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगNavi Mumbaiनवी मुंबईExtortionखंडणीPoliceपोलिसthaneठाणे