शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बारबालांची परेड भोवली; अखेर भालसिंग यांची काशिमीरा पोलीस ठाण्यातून उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 21:38 IST

संजय हजारे यांची काशिमीरा पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभालसिंग हे पूर्वी पासूनच माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या जवळचे मानले जातात. नियुक्तीनंतर भालसिंग यांनी बारबालांची चौकशीनिमित्त परेड काढल्याने त्यांच्यावर काही वर्गातून टीकेची झोड उठली होती.

मीरारोड - बारबालांची परेड काढणं काशिमीरा पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेल्या राम भालसिंग यांना भोवली असून अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केले असून संजय हजारे यांची काशिमीरा पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.भालसिंग हे पूर्वी पासूनच माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काही प्रकरणात मेहता व त्यांच्या निकटवर्तीयना झुकते माप दिल्याने शिवसेनेसह आमदार गीता जैन त्यांच्या पक्षपातीपणाबद्दल नाराज होते. काही प्रकरणात नागरिकांचा संताप व्यक्त झाला होता. परंतु सत्तेत असताना मेहतांचा वरदहस्त असल्याने भालसिंग यांच्या विरोधात तक्रारी होऊन देखील ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप तक्रारदार करत होते.त्यातच सत्ताबदला नंतर भालसिंग यांना पोलीस अधीक्षक यांनी काशिमीरासारखे क्रीम पोस्टिंग म्हणून ओळखणारे पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, नियुक्तीनंतर भालसिंग यांनी बारबालांची चौकशीनिमित्त परेड काढल्याने त्यांच्यावर काही वर्गातून टीकेची झोड उठली होती. आमदार गीता जैन यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी भालसिंग यांना ठाणे ग्रामीण कंट्रोल येथे हलवले होते. भालसिंग यांनी पुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात नियुक्त  करावे यासाठी प्रयत्न चालवले होते. पण आज सोमवारी राठोड यांनी भालसिंग यांची उचलबांगडी करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय हजारे यांची नियुक्ती काशिमीरा पोलीस ठाण्यात केली आहे.

टॅग्स :TransferबदलीPoliceपोलिसmira roadमीरा रोड