शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लाचलुचपत विभागाने वनपाल व वनरक्षकाला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:47 IST

पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या गोखिवरे रेंजनाका येथील वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षकाला १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी गुरुवारी रात्री सापळा रचून अटक केली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या गोखिवरे रेंजनाका येथील वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षकाला १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी गुरुवारी रात्री सापळा रचून अटक केली आहे. वनरक्षक पन्नालाल बेलदार (३५) आणि वनपाल पंकज सनेर (४५) या दोघांविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे. सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुध्द बाजूने दरवाजे आहेत. तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्याजाण्याच्या सोईकरीता महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते. वनपाल पंकजने त्यांना १६ सप्टेंबरला कार्यालयात बोलावले. महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायदयानुसार तात्काळ कारवाई करण्याची धमकी दिली. त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर वनपाल पंकज व वनरक्षक पन्नालाल या दोघांनी प्रत्येक खोलीमागे ८० हजार रुपये अशी ३ खोल्यांसाठी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने कारवाई टाळण्यासाठी नाईलाजास्तव मागणी केलेल्या रकमेपैकी ९० हजार रुपये १६ सप्टेंबरला दिले. उर्वरित पैश्यासाठी आरोपींनी तगादा केल्यावर २५ सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती. त्यानंतरही पैश्यासाठी तगादा केल्यावर तक्रारदाराने गुरुवारी पालघरच्या लाचलुचपत विभागात तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणीत दोघांनी ९० हजार रुपये स्विकारले असून उर्वरित रक्कम तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने लागलीच गोखिवरेच्या रेंज नाका येथील वनविभागाच्या कार्यालयात लावलेल्या सापळा पंचनाम्याच्या दरम्यान वनरक्षक पन्नालाल याला ४० हजार रुपये स्विकारताना जागेवरच रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी