शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:14 IST

त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : भारतीय नाैदलातील गाेपनीय माहिती पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) ला देणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याच्या पाेलिस काेठडीत ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्यानंतर त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने  हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुड्या आणि वेगवेगळ्या युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे. या पाणबुड्या, युद्धनाैकांचे लाेकेशन सांगून काेणती नाैका काेणत्या ठिकाणी उभी आहे, याची माहितीही दिली. वर्माला एटीएसने २९ मे राेजी  पाकिस्तानसाठी हेरगिरी करत भारतीय नाैदलाची संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणी  अटक केली. ताे पाकिस्तानच्या पायल शर्मा आणि इस्प्रीत  या दोन वेगवेगळ्या नावांनी चालविण्यात येत असलेल्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात हाेता.

खुलासा हाेणे अजून बाकी

दरम्यान, त्याने संवेदनशील बाबींची माहिती पाकला पुरविली नसून संबंधित माहिती गुगलवरही उपलब्ध असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्याच्याकडे मिळालेल्या निळ्या डायरीमध्येही काेणतीही विशेष माहिती नसून त्यात दाेन पानांव्यतिरिक्त काही नाही. काेणाचे नावही नाही. त्यात केवळ आजचे काम काय? आणि उद्याचे काम काय? अशी राेजनिशी आहे. त्याने युद्धनाैकांसह आणखीही काेणती माहिती पाकच्या हेरगिरी करणाऱ्या पीआयओंना दिली, याचा खुलासा हाेणे बाकी असल्याने त्याच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली.

वर्मा म्हणताे, मी खूप घाबरलाेय!

जीन्स पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केलेल्या आराेपी वर्माला न्यायालयाने एटीएसविरुद्ध काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा आपल्याला एटीएसविरुद्ध काेणतीही तक्रार नाही; मात्र, आपण खूप घाबरलाे असल्याचे ताे म्हणाला. काेणतीही नाेटीस न बजावता, त्याला अटक केल्याचा दावा करीत त्याच्यावरील आराेपांचे त्याच्या वकिलांनी खंडन केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल