शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Etawah News: हुंड्यात मिळालेल्या कारनं पुजेवेळी ४ जणांना उडवलं, वराच्या आत्येचा मृत्यू; आनंदावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 15:26 IST

उत्तर प्रदेशातील इटावा येथे शुभ मुहूर्तावर एक दुर्दैवी अपघात घडला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. एका कुटुंबात आयोजित तिलक सोहळ्यात कार अपघातामुळे आनंदाचं रुपांतर शोकात झालं.

इटावा:

उत्तर प्रदेशातील इटावा येथे शुभ मुहूर्तावर एक दुर्दैवी अपघात घडला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. एका कुटुंबात आयोजित तिलक सोहळ्यात कार अपघातामुळे आनंदाचं रुपांतर शोकात झालं. पीएसीमध्ये काम करणाऱ्या हवालदाराला तिलक समारंभात कार मिळाली होती. पूजा आणि नारळ फोडण्याच्या समारंभात वराचा कारवरील ताबा सुटला. कारनं ४ जणांना उडवलं. यात वराच्या मावशीचा मृत्यू झाला.

इटावा येथील इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीएसीमध्ये तैनात असलेल्या जवानाचा तिलक सोहळा सुरू होता. कुटुंबीयांनी वधूच्या वतीने विधी पार पाडले. त्याचवेळी तिलक समारंभात हुंडा म्हणून मिळालेल्या नवीन कारच्या पूजेच्या वेळी वराने नारळ फोडण्यासाठी कार चालू करुन पुढे आणली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटून सोहळ्यात उपस्थित चार जणांना उडवलं. 

हा अपघात फतेहपूर पीएसीमध्ये तैनात कॉन्स्टेबल अतुल कुमार यांच्या हातून घडला. त्यांचंच लग्न होतं. उपचारादरम्यान कॉन्स्टेबलची आत्या सरला देवी यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे ऐन आनंदाच्या क्षणी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना इटावा एसएसपी जयप्रकाश सिंह यांनी कारचा अपघात झाला ज्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेबाबत अद्याप कोणाकडूनही तक्रार करण्यात आलेली नाही. तक्रार येताच कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी