शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ 12 कोटी रुपयांचा मालक अजूनही पडद्याआड; टिपरसह दोघे विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:18 IST

ताेतया पोलिसांचा छापा; टिपरसह दोघे विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : विलेपार्लेच्या हॉटेल बावा इंटरनॅशनलमध्ये तोतया पोलीस बनून १२ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. मात्र त्या १२ काेटींचा मालक अजून पडद्याआड असून अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून उघड केलेली नाही.

विलेपार्ले पोलिसांनी कार्तिक ऊर्फ लक्ष्मणला ताब्यात घेतले आहे, जो या प्रकरणात टिपर असल्याची माहिती आहे. तर आसिफ सय्यद असे ताब्यात घेतलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. साेमवारी या दोघांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आसिफ १७ फेब्रुवारीला हॉटेल बावा इंटरनॅशनलमधून पैशांची बॅग घेऊन पसार झाल्याचा आरोप त्याच्यावर असून त्याने आत्मसमर्पण केल्याचे त्याचे वकील टी. ए. ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी नऊ जणांना अटक केली. ज्यात प्रेमचंद जयस्वाल हा तोतया पोलीस बनल्याची माहिती आहे. तिघांच्या अटकेबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

अटक आरिफ आणि आसिफ सय्यद या दोघा भावांचे वकील ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार १८ फेब्रुवारीला विलेपार्ले पोलिसांनी आरिफला अंधेरीच्या नामांकित हॉटेलमधून ताब्यात घेतले. मात्र दोन दिवसांनंतर म्हणजे १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्याला अटक दाखवली. पण १७ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला तेव्हा तो मुंबईतच नव्हता. तर आसिफने आत्मसमर्पण केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी