शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीची झिंग...दारूच्या नशेत व्यावसायिकांकडून तरुणीला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:59 IST

उच्चभ्रू वसाहतीतील घटना, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टी दरम्यान नशा जास्त झाल्याने हॉटेल व्यावसायिकाकडून तरुणीला मारहाण झाल्याची घटना ना म जोशी मार्ग येथील लोढा बेलिसिमो बिल्डींगमध्ये घडली. याप्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीसांनी बिपिन कुमार सिंग विरोधात मंगळवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  

 गोरेगाव परिसरात राहणाऱ्या  स्वागता गिरीश शहा (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांची फ्युचर क्राफ्ट इव्हेंट कंपनी असून त्या कलाकर व अँकर आहे. शहा यांची दहा दिवसांपूर्वी बिपीन कुमार सिंग सोबत ओळख झाली.  सिंगने  होळी सणानिमत्त बलाला कॅफे येथे ईव्हेंट करायचा असल्याबाबत सांगितले. त्यामुळे त्यांची दोन वेळा भेट झाली. १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी मित्र विरेन पटेल, विरेन पटेलची मैत्रिण चक्रवती, बिपीन कुमार सिंग यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर, विरेन पटेल यांच्या ना म जोशी मार्ग येथील अपोलो मिल कम्पाउंड येथील लोढा बेलिसिमो बिल्डींगमध्ये

 येथे पहाटे साडे चार वाजेपर्यंत पार्टी केली. सिंगने त्याच्या दोन मित्र व तीन मैत्रीण यांना देखील विरेन याच्या घरी पार्टीसाठी बोलावुन घेतले. पार्टीमध्ये बिपीनकुमार याने नशा केल्यामुळे तो हायपर झाला. पार्टीमध्ये तो सर्वाशी उध्दट्टपणे व आरेरावीच्या भाषेत बोलून गोंधळ घातला.

 

आरडाओरड करून पार्टीमधील मुलींची छेडछाड करू लागला. त्यामुळे पार्टीमधील सर्वांनी निघुन जाण्यास सांगु लागले. बिपीनकुमार कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर, बिपीनकुमार याला समजविण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने जबरदस्तीने सोबत नेत कानाखाली मारली. तरुणी खाली कोसळली.  कानातुन व नाकातून रक्त आले. त्यावेळी बिपीन कुमार हा तेथुन खाली निघुन गेला. त्यांनी पुन्हा त्याच्यामागे येत मारहाण का केली? याबाबत जाब विचारला. त्याने, हात पकडुन मुरगळला. आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  आरडाओरड करताच लोढा बेलिसिमो बिल्डींगच्या सोसायटीच सिक्युरीटी गार्ड हे तेथे आले. त्यावेळी बिपीनकुमार हा निघुन गेला.

    तरुणीला  के. ई. एम रुग्णालयात दाखल केले. उपचार करून बिपीन कुमार सिंग याच्या विरोधात पोलीस ठाणेस तक्रार देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी