शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून कोपरीत गुंडावर दोघा भावांनी केले चॉपरने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 17:13 IST

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्दे याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हल्ल्यानंतर विकास आणि विशाल हे दोघेही पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सांगितले. जमादार तुकाराम डुंबरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

ठाणे : पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (25, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडावर कोपरीतील सिद्धार्थनगर भागात दोन भावांनी पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरीतील सिद्धार्थनगर भागातून 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास रेवणकर हा जात होता. त्यावेळी त्याचा विशाल चेकालिया (20) आणि विकास चेकालिया (17) या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्याचवेळी विशालने रेवणकर याच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळयात खाली कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या भावाने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही भावांनी जुना वाद उकरुन त्याच्याशी भांडणो केल्याचा आरोप आहे. तर रेवणकर याच्यावरही कोपरी पोलीस ठाण्यात याआधी हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या हल्ल्यानंतर विकास आणि विशाल हे दोघेही पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सांगितले. जमादार तुकाराम डुंबरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

 

टॅग्स :MurderखूनthaneठाणेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल