शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

रहस्य! अनाथ सरस्वतीला ३ बहिणी, शिक्षित असूनही मनोज का करायचा ५ हजारांची नोकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 14:33 IST

मनोज साने आणि सरस्वती वैद्य दोघे अनाथाश्रम जायचे. ती त्याला मामा म्हणायची.

ठाणे - मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या महिलेच्या क्रूर हत्याकांडानंतर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेतील आरोपी मनोज साने याने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला आहे. २००८ पासून त्याची तब्येत बिघडली होती जेव्हा त्याला स्वत:ला HIV पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. अनेक वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर त्याला हॉस्पिटलला दाखल केले होते. तिथे एचआयव्ही संक्रमित सुई अथवा रक्त दिल्यामुळे हे झाले. इतकेच नाही तर मी सरस्वतीची हत्या केली नाही तर तिने आत्महत्या केल्याचा दावा त्याने पोलिसांसमोर केला. 

मनोज सानेला सरस्वती मामा का म्हणायची?सरस्वती वैद्य अनाथ होती. आता तिच्या ३ बहिणीसमोर आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, सरस्वती ही अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालआश्रमात शिकत होती. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सरस्वती मनोजला मामा हाक मारायची असं आश्रम कर्मचारी अनु साळवेने सांगितले. मामा खूप पैसेवाला आहे आणि त्याची कपड्याची मिल आहे असं सरस्वतीने आश्रमात सांगितले होते. 

सरस्वती अनाथ, मग ३ बहिणी कुठून आल्या? सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर तिच्या ३ बहिणी पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. त्यांनी पोलिसांना काय सांगितले हे समोर आले नाही. एका बहिणीसोबत व्यक्तीही होता. तो कोण आहे त्याचा पत्ता नाही. सध्या पोलीस या हत्येचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मनोज साने आणि सरस्वती वैद्य दोघे अनाथाश्रम जायचे. ती त्याला मामा म्हणायची. दोघे सफेद कारने यायचे. सरस्वती स्वत:सोबत आश्रमातील मुलांना जेवण आणि कपडे आणायची. सुरुवातीला ती खूप खुश होती त्यानंतर मागील २ वर्षापासून दु:खी होती. कुणाशी काही बोलायची नाही. ती दु:खी का असायची हे तिने कुणालाही सांगितले नाही. सरस्वती जेव्हा १८ वर्षाची होती तेव्हा आश्रमातून बहिणीकडे गेली होती. 

मनोज रेशन दुकानावर काम करायचा. तेव्हा त्याची भेट सरस्वतीसोबत झाली. मनोजकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सर्टिफिकेट आहे. मग साने इतका शिक्षित होता मग रेशन दुकानावर काम का करायचा असा प्रश्न उभा राहतो. रेशन दुकानावर अवघे ५ हजार रुपये त्याला पगार मिळायचा. त्यात त्याने मीरारोडला भाड्याने फ्लॅट घेतला होता. ज्याचे भाडे ३० हजार रुपये होते. मनोज सानेकडे कार होती. ज्यातून तो सरस्वतीसोबत आश्रमात जायचा. सरस्वती म्हणायची मामा खूप श्रीमंत आहे मग तो रेशन दुकानावर काम का करायचा? याचे उत्तर पोलीस शोधत आहे. 

सरस्वती वैद्य रेशन दुकानावर काम करणाऱ्या मनोजसोबत ३ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायची. डीसीपी जयंत बजबले यांच्यानुसार, महिलेची हत्या ३ जून रोजी रात्री झाली. आरोपीने कटर मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ३ दिवसांनी मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे परिसरात वास पसरला त्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावले. मनोज मागील काही दिवसांपासून रोज कुत्र्यांना जेवण घालतो याआधी तो असे करत नव्हता असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मनोज कुकरमध्ये मांसाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून त्याची पेस्ट बनवून कुत्र्याला खायला द्यायचा असं उघड झाले.